MI vs RCB playing 11 prediction Mumbai Indians vs royal challengers Bangalore playing 11 news in Marathi amd2000 twitter
क्रीडा

MI vs RCB, Playing XI: वानखेडेवर रोहित - विराट आमने सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

Ankush Dhavre

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore, Playing XI Prediction:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील मजबूत संघ आहेत. मात्र दोन्ही संघांना अजूनही सुर गवसलेला नाही. कारण मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११ बदलणार?

सुरुवातीचे तिन्ही सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघावर शानदार विजय मिळवला. मुंबईने ४ पैकी १ सामना जिंकला आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ५ पैकी केवळ १ सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवून गुणतालिकेत वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

या सामन्यातही मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी डावाची सुरुवात करताना दिसेल. यासह टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासारखे फलंदाज मध्यक्रमात असतील. यासह हार्दिक पंड्या , रोमरियो शेफर्ड आणि मोहम्मद नबी जे अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत खेळताना दिसून येतील. तर जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी, पियूष चावला यांच्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे. (Cricket news in marathi)

iplरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेइंग ११ बदलणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस डावाची सुरुवात करताना दिसून येतील. तर रजत पाटीदार, ग्रीन आणि पाटीदार यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. तर मयांक डागर, रिस टॉप्ली, मोहम्मद सिराज हे मुख्य गोलंदाजांच्या भूमिकेत असतील.

अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग ११..

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, हार्दिक पंड्या, रोमारिओ शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्जी आणि जसप्रीत बुमराह.

अशी असू शकते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेइंग ११..

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, मयांक डागर, महिपाल लोमरोर, रिस टॉप्ली आणि मोहम्मद सिराज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT