mumbai indians  saam tv
Sports

MI vs KKR: पहिल्या विजयासाठी मुंबईचा मास्टरप्लान तयार; या तगड्या Playing XI सह उतरणार मैदानात

MI vs KKR Playing XI Prediction: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेतील १२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यामुळे मुंबईचा संघ आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर गेल्या सामन्यात विजय मिळवलेला कोलकाताचा संघ आपला दुसरा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी दोन्ही संघातील प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. यादरम्यान मुंबईला पहिल्या सामन्यात चेन्नईकडून तर दुसऱ्या सामन्यात गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यातून सत्यनारायण राजू आणि मुजीब उर रहमानसारख्या खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो. तर रिस टोप्ली आणि विग्नेश पुथुर या दोघांना संधी मिळू शकते.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, विग्नेश पुथुर आणि रिस टोप्ली.

मुंबई इंडियन्ससह कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्लेइंग ११ मध्येही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. संघातील सलामीवीर फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे तो या सामन्यातून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. तो आल्यानंतर स्पेन्सर जॉन्सनला प्लेइंग ११ मधून बाहेर केले जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेइंग ११:

क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT