IPL 2021 Playing 11: कोलकाता जैसे थे तर, मुंबईचा हिरा संघात दाखल  Twitter/ @IPL
Sports

IPL 2021 Playing 11: कोलकाता जैसे थे तर, मुंबईचा हिरा संघात दाखल

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स (MI) आज आपला दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार (MI vs KKR) आहे.

वृत्तसंस्था

IPL 2021: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स (MI) आज आपला दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार (MI vs KKR) आहे. कोलकात्याने दुसऱ्या टप्प्याची शानदार सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) पराभव केला. त्याचवेळी चेन्नईच्या हातून मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. एकीकडे मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर कोलकाता सहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत प्ले-ऑफसाठी आजचा सामना खूपच रोमांचक असणार आहे. आयपीएलच्या हंगामात मुंबईने 8 सामने खेळले आहेत. या 8 सामन्यांमध्ये संघाने 4 सामने जिंकले आहेत. जर आपण कोलकाताबद्दल बोललो तर त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर संघाने 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये खेळलेले सामने पाहिले तर मुंबई इंडियन्सचा दबदबा आहे. आतापर्यंत दोघांमध्ये 28 सामने खेळले गेले आहेत. या 28 सामन्यांमध्ये मुंबईने 22 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर कोलकाता फक्त 6 वेळा जिंकला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या 6 हंगामात कोलकात्याच्या संघाने मुंबईविरुद्ध फक्त एकदाच विजय मिळवला आहे. गेल्या 12 सामन्यांमध्ये 11 सामने मुंबईने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात त्यांचा कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघात परतू शकतो. त्याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पंड्या देखील आजचा सामना खेळू शकतो. संघात या दोघांच्या आगमनाने संघ खूप मजबूत होवू शकतो. दुसरीकडे कोलकाताचा संघ जैसे थे असणार आहे. टी -20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग बनलेल्या वरुण चक्रवर्तीने बंगळुरूविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. त्याला मुंबईविरुद्धही आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवायची आहे.

कोलकाता संघ

शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (WK), आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, प्रसिध कृष्ण, वरुण चक्रवर्ती.

मुंबई संघ

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जॅन्सेन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT