mi vs kkr saam tv
Sports

MI vs KKR: मुंबईची खैर नाय..KKR चा तगडा प्लेअर कमबॅकसाठी सज्ज; आज खेळणार

Sunil Narine: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सला अजूनही आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.

एकीकडे मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजीचा सराव करायला सुरुवात केली आहे. तो लवकरच मुंबई इंडियन्स संघात कमबॅक करु शकतो. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघासाठीही दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनदेखील कमबॅकसाठी सज्ज झाला आहे.

सुनील नरेन कमबॅक करणार?

कोलकाता नाईट रायडर्स संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन दुखापतीमुळे गेल्या सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली गेली होती. आता मुंबईविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून सुनील नरेन कमबॅक करु शकतो.

केकेआरचा पहिला सामना आरसीबीविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात सुनील नरेनला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली होती. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने २६ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले होते. यासह गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात २७ धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान त्याने १ गडी बाद केला होता.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, विग्नेश पुथुर आणि रिस टोप्ली.

कोलकाता नाईट रायडर्स - क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, वैभव अरोडा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT