Mumbai Indians IPL 2025 Qualification Scenario X
Sports

MI Vs DC सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यास काय होईल? IPL 2025 मध्ये पलटन कशी क्वालिफाय होणार?

MI IPL 2025 Qualification Scenario : वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळला जाणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्याच्या उद्देशाने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Yash Shirke

IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. चौथ्या आणि शेवटच्या जागेसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात स्पर्धा होती. परवा (१९ मे) हैदराबादने लखनऊचा पराभव केला आणि लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये बाहेर पडला. आता मुंबई आणि दिल्ली यांच्यात शेवटच्या जागेसाठी लढत आहे.

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने आजचा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबईचा संघ चौथ्या १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर १२ गुणांसह पंजाब पाचव्या स्थानी आहे. मुंबईने हा सामना जिंकला, तर संघ लगेच प्लेऑफमध्ये जाईल. तर दिल्लीने सामना जिंकल्यास ते प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एक पाऊल पुढे येतील.

जर मुंबईचा पराभव झाला तर?

आजचा सामना मुंबईने गमावला, तर प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होईल. पराभव झाल्यास मुंबईकडे फक्त १४ गुण राहतील. मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाब विरुद्धचा सामना जिंकावा लागेल. याशिवाय इतर सामन्यांमधील निकालावरही मुंबईला अवलंबून राहावे लागेल. पण हा सामना जिंकल्यास मुंबई प्लेऑफमध्ये जाईल.

दिल्ली कॅपिटल्सने आजचा सामना जिंकल्यास त्यांचे १५ गुण होतील. मुंबई प्रमाणे दिल्लीचा सामना देखील पंजाब विरुद्ध आहे. तो सामना जिंकल्यास १७ गुणांसह ते प्लेऑफमध्ये जातील. पण सामन्यात पराभव झाल्यास त्यांचे १५ गुण राहतील. शेवटी मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यावर आणि नेट रन रेटवर दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न अवंलबून राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT