mi vs dc ipl 2024 romario shepherd scored 32 runs in last over against Anrich Nortje watch video  twitter
Sports

MI vs DC, IPL 2024: ४,६,६,६,४,६... वानखेडेवर शेफर्डचं वादळ! नॉर्खियाला धू धू धुतला - Video

Romario Shepherd Batting: या सामन्यातील शेवटच्या षटकात शेफर्डने तुफान फटकेबाजी केली. त्याने शेवटच्या षटकात ३२ धावा कुटल्या.

Ankush Dhavre

Romario Shepherd Last over Hitting Against Anrich Nortje:

वानखेडे स्टेडियमवर रोमारियो शेफर्डने वादळ आणलं. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रोमारियो शेफर्डने दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाजांचा चांगलाच बाजार उठवला. त्याने एनरिक नॉर्खिच्या शेवटच्या षटकात फलंदाजी करताना ३२ धावा कुटल्या.

वानखेडेवर शेफर्ड नावाचं वादळ...

या सामन्यात रोमारियो शेफर्डला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं करुन दाखवलं. हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर रोमारियो शेफर्ड फलंदाजीला आला. फलंदाजीला येताच त्याने दिल्लीच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. त्याने अवघ्या १० चेंडूंचा सामना करत ३९ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले.

नॉर्खियाचं सर्वात महागडं षटक..

मुंबई इंडियन्सने या सामन्यातील १९ व्या षटकापर्यंत २०२ धावा केल्या होत्या. शेवटचं षटक टाकण्यासाठी एनरिक नॉर्खिया गोलंदाजीला आला. त्याने नॉर्खियाच्या षटकात तब्बल ३२ धावा कुटल्या. शेफर्डने नॉर्खियाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत षटकाची सुरुवात केली. त्यानंतर त्याने पुढील चेंडूवर ३ लागोपाठ षटकार मारले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारत इनिंगचा शेवट केला. (Cricket news in marathi)

मुंबईने उभारला २३४ धावांचा डोंगर..

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्स संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ४२ धावा चोपल्या. शेवटी फलंदाजी करताना टीम डेव्हिडने नाबाद ४५ धावांची खेळी केली. तर रोमारियो शेफर्डने ३९ धावा चोपल्या. मुंबईने २० षटकअखेर ५ गडी बाद २३४ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT