MI vs DC IPL 2024 Mumbai indians vs delhi capitals ipl live amd2000 twitter
Sports

MI vs DC Live Update: रोहित- इशानचं वादळ अन् शेवटी शेफर्डनं उडवला धुरळा! दिल्लीसमोर विजयासाठी डोंगराइतकं आव्हान

Mumbai Indians vs Delhi Capitals: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

Mumbai Indians vs Delhi Capitals, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे . या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद २३४ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३५ धावांची गरज आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबई इंडियन्स संघाकडून इशान किशन आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. चांगली सुरुवात मिळालेला रोहित शर्मा ४९ धावांवर माघारी परतला. तर इशान किशन ४२ धावा करत माघारी परतला. आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही.

तो २ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हिड यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. कर्णधार हार्दिक पंड्याने महत्वपूर्ण ३९ धावा केल्या. तर टीम डेव्हिडने ३९ आणि रोमारियो शेफर्डने नाबाद ३९ धावांची खेळी खेळी करत संघाची धावसंख्या २३४ धावांवर पोहोचवली.

दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, अक्षर पटेलने ३५ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर एनरिच नॉर्खियाने ६५ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तो या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. (Cricket news in marathi)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११..

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg : विवाहितेची आत्महत्या, पतीसह माजी नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार; ठाकरे गटाचे नेते पोलीस स्टेशनवर धडकले

Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

Maharashtra Live News Update : बदनामी थांबवा! पडळकर एफ सी रोड वर या

Nagpur News: नागपूरच्या पबमध्ये टेबलच्या वादातून राडा; तरुणाला बेदम मारहाण | VIDEO

India vs England 3rd Test Day 2 scorecard update : जसप्रीत बुमराहचा जबरा 'पंच'; इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी धुव्वा, ३८७ धावांवर गारद

SCROLL FOR NEXT