Suryakumar Yadav to Lead Mumbai Indians 
Sports

IPL 2025 : सूर्यादादा करणार मुंबईचे नेतृत्व, हार्दिक पांड्यानेच केली घोषणा, रोहितच्या चाहत्यांना शॉक

hardik pandya on mi vs csk IPL News : मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने याने जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबात आणि पहिल्या सामन्यात कोण कर्णधर असेल... याबाबत आज माहिती दिली. मुंबईचा पहिला सामना चेन्नईसोबत होणार आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

hardik pandya suryakumar yadav and rohit sharma : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ( MI vs CSK) खेळणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये लढत होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व (Suryakumar Yadav to Lead Mumbai Indians) कऱणार आहे. हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत आज याबाबतची घोषणा केली.

आयपीएल २०२४ मधील अखेरच्या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात मुंबईचं नेतृत्व कोण करणार? याची चर्चा रंगली होती. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी कोण पहिल्या सामन्यात नेतृत्व करणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. हार्दिक पांड्याने आज सूर्यकुमार यादव पहिल्या साम्यात मुंबईचं नेतृत्व करेल, असे सांगत रोहित शर्माच्या चाहत्यांना जोरदार शॉक दिला.

हार्दिक पांड्या उपलब्ध का नाही?

गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेवेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला तीन सामन्यात षटकाची गती राखता आली नाही. त्यामुळे आयपीएलने कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावर एका सामन्याची बंदी घातली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या उपलब्ध नसेल. सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करेल. दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये मुंबईची अवस्था अतिशय दैयनीय झाली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला फक्त चार सामन्यात विजय मिळवता आला होता.

काही सामन्यासाठी बुमराह उपलब्ध नसेल-

सूर्यकुमार यादव मुंबईची धुरा सांभाळणार असल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले. त्याशिवाय जसप्रीत बुमराहबद्दलही अपडेट दिली. जसप्रीत बुमराह सुरूवातीच्या काही सामन्याला उपलब्ध नसेल. हार्दिक पांड्या म्हणाला की, मी खरेच खूप भाग्यवान आहे. माझ्यासोबत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या रूपाने तीन कर्णधार खेळत आहेत. तिघेही नेहमीच माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे असतात. जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे.तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल.

मुंबई इंडियन्स संघाचा संपूर्ण संघ

• फलंदाजः सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेवन जेकब्स

• जलदगती अष्टपैलू खेळाडूः हार्दिक पांड्या, नामन धीर, राज अंगद बावा, दीपक चहर

• फिरकी अष्टपैलू खेळाडूः विल जॅक्स, मिचेल सँटनर

• यष्टीरक्षकः रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, कृष्णन श्रीजित

• जलदगती गोलंदाज: जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, रीसे टॉपली, कॉर्बिन बॉश, सत्यनारायण राजू, अर्जुन तेंडुलकर

• फिरकी गोलंदाजः कर्ण शर्मा, मुजीब उर रहमान, विघ्नेश पुथूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT