Mumbai Indians Playoffs Scenario 2025 X
Sports

IPL Playoffs Scenario 2025 : 6 पैकी 4 सामन्यात पराभव, तरीही प्लेऑफचे दरवाजे मुंबई इंडियन्ससाठी खुले, कसं आहे समीकरण?

Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलवर सातव्या क्रमांकावर आहे. ६ पैकी २ सामन्यात मुंबईचा विजय झाला आहे. तेव्हा मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण

Yash Shirke

MI Playoffs Scenario 2025 : आयपीएल २०२५ चा थरार सुरु आहे. आतापर्यंत ३२ सामना खेळले गेले आहेत. आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना खेळला जाणार आहे. सुरुवातीला मागे पडलेल्या मुंबईच्या संघाने दमदार कमबॅक केले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात मुंबईने एकूण सहा सामने खेळले आहेत. यातील ४ सामन्यात पराभव झाला. तर २ सामने मुंबईने जिंकले. मुंबई सध्या पॉईंट्स टेबलवर सातव्या स्थानी आहे.

मुंबईचा पहिला सामना चेन्नईच्या विरुद्ध झाला होता. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने या सामन्यात नेतृत्त्व केले होते. चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर गुजरात टायटन्सनेही मुंबईला पछाडले. तिसऱ्या सामन्यात केकेआर विरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ मधील पहिला विजय मिळाला. त्यानंतर लखनऊ आणि बंगळुरूने मुंबईवर मात केली. दिल्ली विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला. आज मुंबई हैदराबादला वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या पुढील सामन्यांचे शेड्यूल

१७ एप्रिल - मुंबई विरुद्ध हैदराबाद (मुंबई)

२० एप्रिल - मुंबई विरुद्ध चेन्नई (मुंबई)

२३ एप्रिल - हैदराबाद विरुद्ध मुंबई (हैदराबाद)

२७ एप्रिल - मुंबई विरुद्ध लखनऊ (मुंबई)

१ मे - राजस्थान विरुद्ध मुंबई (जयपुर)

६ मे - मुंबई विरुद्ध गुजरात (मुंबई)

११ मे - पंजाब विरुद्ध मुंबई (चंडीगढ)

१५ मे - मुंबई विरुद्ध दिल्ली (मुंबई)

मुंबई इंडियन्सचे अशा प्रकारे ८ सामने उरले आहेत. मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. इतर कोणत्याही संघांवर निर्भर न राहता प्लेऑफमध्ये जायचे असल्यास मुंबई इंडियन्सला कमीत कमी ७ सामने जिंकावे लागतील. ६ सामने जिंकल्यास मुंबईकडे एकूण १६ गुण होतील. अशा वेळी अन्य संघांच्या कामगिरीवर मुंबईचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. जर ८ सामन्यातील ३ सामने गमावले, तर मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करणे शक्य होणार नाही असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Online Meeting : शिक्षण विभागाची ऑनलाइन मीटिंग, अचानक अश्लील व्हिडिओ शेअर; शिक्षिकेवर कारवाई

Maharashtra Live News Update: नांदेडच्या किनवट तालुक्यात पूर परिस्थिती

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

SCROLL FOR NEXT