mens junior hockey team twitter
Sports

Junior Asia Cup: टीम इंडियाने रचला इतिहास! पाकिस्तानला नमवत सलग तिसऱ्यांदा कोरलं जेतेपदावर नाव

Hockey News In Marathi: ज्युनिअर आशियाई हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला नमवत सलग तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.

Ankush Dhavre

भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. ज्युनियर आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारतीय संघाकडून खेळताना अराइजीत सिंग विजयाचा हिरो ठरला.

त्याने या सामन्यात ४ गोल केले. तर दिलराज सिंगने १ गोल केला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. मात्र शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने मुसंडी मारली आणि सामना खिशात घातला.

या सामन्यात गोल करण्याची सुरुवात पाकिस्तानकडून झाली. पहिल्याच क्वार्टरमध्ये हनान शाहितने पाहिला गोल केला. इथपर्यंत भारतीय संघ बॅकफूटवर होता. मात्र त्यानंतर चौथ्या मिनिटालाच भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं. चौथ्या मिनिटाला अराइजित सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून भारतीय संघाला बरोबरी साधून दिली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये अराइजित सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत भारतीय संघाला २-१ ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १९ व्या मिनिटाला दिलराज सिंगने गोल करत आघाडी ३-१ वर पोहोचवली. तर ३० व्या मिनिटाला पाकिस्तानच्या सुफियान खानने गोल करत पाकिस्तानला ३-२ ने कमबॅक करून दिलं.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने ३-३ ने बरोबरी साधली. या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आणखी २ गोल करत गोलची संख्या ५ वर पोहोचवली. यासह हा सामना भारतीय संघाने ५-३ ने आपल्या नावावर केला. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ज्युनिअर आशियाई चॅम्पियनशिपवर  नाव कोरलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT