Table Tennis Player D Vishwa  Saam Tv
Sports

भारताच्या युवा टेनिसपटूचा अपघाती मृत्यू, शिलॉंगला जाताना अपघात

तामिळनाडूच्या अव्वल टेबल टेनिसपटूंपैकी एक दीनदयालन विश्वाचा (Deenadayalan Vishwa) भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: तामिळनाडूच्या अव्वल टेबल टेनिसपटूंपैकी एक दीनदयालन विश्वाचा (Deenadayalan Vishwa) भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला (Shillong) जात असताना ही दुर्घटना घडली. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ८३ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेकरिता गुवाहाटीहून शिलाँगला जात असताना रविवारी त्याचा अपघात (accident) झाला आहे. गंभीर जखमी झाल्यामुळे दीनदयालन विश्वचा मृत्यू झाला आहे. (meghalaya top tamil nadu table tennis player d vishwa dies road accident)

हे देखील पहा-

तामिळनाडूचा टेबल टेनिसपटू दीनदयालन हा विश्वा तमिजगा टेबल टेनिस असोसिएशन (TTTA) राज्य पुरुष संघाचा खेळाडू होता. मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणाऱ्या ८३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्यीय टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेण्याकरिता तो जात होता. या अपघातामध्ये कार चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचे नाव दीपल दास असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग सहावर मागून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने कारला उडवले आणि ५० मीटर दरीत कोसळला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचालक आणि कारमधील जखमींना तात्काळ नॉनपोह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींना नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस (NEIGRIHMS) रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. डी विश्वाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नोंगपोह सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT