वृत्तसंस्था: देशात कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २१८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. काल ११५० नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृत्यूंसह देशात मृतांची संख्या ५ लाख २१ हजार ९६५ इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ५४२ इतकी झाली आहे. (Corona Cases News Updates)
हे देखील पहा-
सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५४२ इतकी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ५४२ इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरामध्ये देशात १९८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ९६५ इतकी झाली आहे. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २५ लाख १० हजार ७७३ रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. याबरोबरच देशात सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०३ टक्के इतका आहे.
आतापर्यंत १८६ कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत १८६ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरामध्ये देशात २ लाख ६६ हजार ४५९ कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत १८६ कोटी ५४ लाख ९४ हजार ३५५ कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.