MCA Election Ajinkya Naik ANI
Sports

MCA Election: अजिंक्य नाईक होणार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष; फडणवीसांच्या पसंतीच्या उमेदवाराने मारली बाजी

MCA Election Ajinkya Naik: मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद खूप महत्त्वाचं आहे. अमोल काळे यांच्या निधनानंतर हे अध्यक्ष पद रिक्त होतं. त्यानंतर या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अंजिक्य नाईक यांचा विजय झालाय.

Bharat Jadhav

सचिन गाड, साम प्रतिनिधी

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणुकीत अंजिक्य नाईक यांचा विजय झालाय. अंजिक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत १०७ मतांनी विजय मिळवलाय. अजिंक्य नाईक यांना २२१ मते मिळाली आहेत. अंजिक्य नाईक यांच्या विजय झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. रणजी चषक आणि भारतीय संघाला क्रिकेटर देण्याचं काम तसेच मुंबई क्रिकेटसाठी छोट्यात छोटी गोष्टीपासून ते मोठ्यात मोठी गोष्ट करायची असल्याचं नाईक म्हणालेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. त्यामुळे या संघटनेचा अध्यक्षपद महत्त्वाचं आहे.

क्रिकेटर आणि क्लबचे सदस्य यांचा हा विजय आहे. महिला पुरुष सगळे क्रिकेटर आमच्या समर्थनात होते. ही दुःखाची निवडणूक होती, हा विजय अमोल काळे यांचा विजय आहे. त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी निवडणूक लढलो होतो. पवारसाहेबसह आणि सगळ्याच पक्षातील नेत्यांनी आम्हाला सहकार्य केलं. क्रिकेटसाठी असंच काम सुरू राहील. माझ्या सारख्या तरुणावर सगळ्यांनी विश्वास ठेवला. मायक्रो लेव्हलपासून ते मोठ्यात मोठी अश्या सगळ्याच गोष्टी मुंबई क्रिकेटसाठी करायच्या आहेत. रणजी चषक आणि भारतीय संघाला क्रिकेटर देणे हे आमच उद्दिष्ट असल्याचं अंजिक्य नाईक म्हणालेत.

१० जून रोजी अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये अमोल काळे यांच्या अकाली निधनानंतर एमसीएचं अध्यक्ष पद रिक्त होतं. त्यानंतर या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक हे रिंगणात होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर पार पडली.

या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे पसंतीचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली. त्यांनी आशिष शेलार यांच्या गटातील उमेदवार संजय नाईक यांचा तब्बल १०७ मतांच्या फरकाने पराभव केलाय. अजिंक्य नाईक २०१५ पासून MCA मध्ये काम करत आहेत. आधी मार्केटिंग कमिटीमध्ये नंतर अपेक्स कौन्सिल सदस्य, आता सचिव आणि आता ते अध्यक्ष होणार आहेत.

कोण होते एमसीएचे मतदार?

मैदान क्लब : २११

ऑफिस क्लब : ७७

शाळा, महाविद्यालय: ३७

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू: ५०

एकूण मतदार: ३७५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT