kolhapur football match (file photo) saam tv
क्रीडा

Kolhapur Football: कोल्हापूरातील फुटबॉलच्या इतिहासात 'याची' हाेईल नाेंद? उद्यापासून रंगणार सामने

सामन्यांच्या आयोजनासंदर्भात प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली.

साम न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काेविड १९ च्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून स्थगित ठेवण्यात आलेल्या महापौर करंडक फुटबॉल (kolhapur mayour trophy football tournament) स्पर्धेतील राहिलेले सामने उद्यापासून (शुक्रवार) घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. परंतु फुटबाॅलप्रेमींत नाराजीचा सूर पसरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हे सामने सुरु असताना शाहू स्टेडियमध्ये (shahu satdium kolhapur) प्रेक्षकांना (spectators) एंट्री नसणार आहे.

कोल्हापूर (kolhapur) आणि फुटबॉल (football) हे एक अतूट नातं आहे. या नात्यात यंदा काेराेनाने प्रेक्षकांची मात्र ताटातूट केली आहे. यंदा प्रथमच फुटबाॅलप्रेमींविना खेळाडूंना सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे ना टाळ्या, शिट्यांचा गजर अशा वातावरणात खेळाडूंना देखील सामने खेळताना जड जाणार हे निश्चित. दरम्यान प्रेक्षकांना सामना पाहता यावा यासाठी त्याचे युट्यूबवर (youtube) थेट प्रक्षेपण करण्याचं नियाेजन संयाेजकांनी केले आहे. काेल्हापूरच्या फुटबाॅलच्या इतिहासात कधी नव्हे ते प्रेक्षकांविना सामना हाेणार असल्याने त्याची देखील नाेंद हाेईल अशी शक्यता आहे. (kolhapur latest marathi news)

कोल्हापूर महापालिकेने दाेन वर्षापुर्वी महापौर करंडक फुटबॉल स्पर्धा आयाेजिली हाेती.मात्र काेविड १९ (covid19) चा संसर्ग सुरु झाला आणि देशातील सर्वच स्पर्धांना त्याचा फटका बसला. काेल्हापूरातील महापाैर करंडक देखील त्यास अपवाद ठरली नाही. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने (kolhapur sports association) या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील एक सामना आणि अंतिम सामना त्यावेळी स्थगित केला हाेता.

काेविड १९ (covid19) चा संसर्ग गत दोन वर्षात काही केल्या कमी हाेत नव्हता. त्यामुळे काेल्हापूरातील फुटबाॅलपटूंना स्पर्धा केव्हा सुरु हाेणार याची आतुरता लागली हाेती. सध्या काेल्हापूरात कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व जिल्हा प्रशासनाने काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांच्या नियमांचे पालन करीत महापाैर करंडक फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यांना हिरवा कंदील दाखविला आहे.

येत्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत काेल्हापूरातील शाहू स्टेडियमवर महापाैर करंडकाचे सामने रंगणार आहेत. हे सामने पाहण्यास फुटबॉलप्रेंमींना मज्जाव करण्यात आला आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर केले जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

असे रंगणार सामने (kolhapur football)

शुक्रवार (ता.११) दिलबहार तालीम विरुध्द फुलेवाडी क्रीडा मंडळ (उपांत्य फेरीचा सामना)

शनिवार (ता.१२) जनप्रतिनिधी विरुध्द प्रशासकिय अधिकारी-कर्मचारी

रविवारी (ता.१३) दुपारी ३.३० वाजता - प्रॅक्टीस क्लव विरुध्द शुक्रवारच्या सामन्यातील विजेता (अंतिम सामना)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT