mayank yadav enter indian team soon but these 3 bowlers could not handled the pressure of international cricket amd2000 twitter
Sports

Mayank Yadav: सर्वात वेगवान गोलंदाज असूनही मयंक यादवला भारतीय संघात मिळणार नाही स्थान? ही आहेत कारणं!

Mayank Yadav In Team India News: मयांक यादव हा सध्या तुफान चर्चेत आहे. पदार्पणाच्या सामन्यात या गोलंदाजाने आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला. अवघ्या २ सामन्यात त्याने ६ गडी बाद केले आहेत.

Ankush Dhavre

Mayank Yadav In Team India:

मयांक यादव हा सध्या तुफान चर्चेत आहे. पदार्पणाच्या सामन्यात या गोलंदाजाने आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला. अवघ्या २ सामन्यात त्याने ६ गडी बाद केले आहेत. या शानदार कामगिरीनंतर त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळणार का? मात्र मयांक यादवच्या आधी देखील असे काही गोलंदाज होते जे एका रात्रीत स्टार झाले, मात्र आपली छाप सोडू शकले नाहीत.

या यादीत पहिल्या स्थानी आहे जम्मु -काश्मिर एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला उमरान मलिक. त्याने आपल्या पहिल्याच हंगामात वेगवान गोलंदाजी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या गतीच्या बळावर त्याला रेकॉर्ड मोडता आले नाही,मात्र त्याने फलंदाजांच्या मनात भिती नक्कीच निर्माण केली. या भन्नाट वेगवान गोलंदाजीच्या बळावर त्याने भारतीय संघात स्थान तर मिळवलं तर,मात्र त्याला संघातील स्थान टीकवून ठेवता आला नाही.

उमरान मलिकला भारतीय संघाकडून १० वनडे आणि ८ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान वनडे क्रिकेटमध्ये त्याला १३ आणि टी-२० क्रिकेटमध्ये ११ गडी बाद करता आले. तो २९ जुलै २०२३ रोजी आपला शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त फ्रेब्रुवारी २०२३ मध्ये तो आपला शेवटचा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. (Cricket news in marathi)

कुलदीप सेन...

कुलदीप सेनने आयपीएल २०२२ स्पर्धेत पदार्पण केलं आणि शानदार कामगिरी केली. त्याने ९ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना ८ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर त्याने भारतीय वनडे संघात पदार्पण केलं होतं. त्याला बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने २ गडी बाद केले होते. मात्र २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल २०२३ स्पर्धेतही त्याला केवळ २ सामने खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याला राजस्थान रॉयल्स संघाने रिटेन केलं आहे.

शिवम मावी..

शिवम मावीला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याला स्विंगचा किंग असं म्हटलं जाऊ लागलं होतं. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तो न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT