Shengdanyachi Barfi Recipe: उपवासाला बनवा मावा न वापरता शेंगदाण्याची बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

Sakshi Sunil Jadhav

चैत्र नवरात्री

यंदा चैत्र नवरात्रीला १९ मार्च मार्च २०२६ रोजी सुरूवात होणार आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवाची तयारी घरोघरी सुरू झाली आहे.

no mawa recipe

गोडाचा पदार्थ

चैत्र नवरात्रीला चविष्ट पदार्थांपासून ते मिठाईपर्यंत, उपवासासाठी सर्व काही तयार केलं जातं. त्यामध्ये नेहमीच गोडासाठी काय बनवायचं? हा प्रश्न अनेकांना पडतो.

Chaitra Navratri 2026

उपवासाचा पदार्थ

बराचवेळ पोट भरलेले राहण्यासाठी आणि उपवासाच्या दिवसांमध्ये येणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी गोड पदार्थ आवश्यक असतात. त्यामुळे घरी खास मिठाई बनवली जाते.

Chaitra Navratri 2026

शेंगदाण्याची बर्फी

पुढे आपण नारळ आणि शेंगदाण्यांपासून बनवलेल्या बर्फीची रेसिपी सांगणार जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला बाजारातून मावा विकत आणण्याची गरज लागणार नाही.

Chaitra Navratri 2026

बर्फीने मिळणारे फायदे

फायबर आणि चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे दिवसभर शरीरात पाण्याची पातळी टिकून राहते. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मावा, साखरेचा पाक किंवा इतर कोणतेही विशेष घटक वापरले जात नाहीत.

Chaitra Navratri 2026

साहित्य

१ वाटी भाजलेले शेंगदाणे, १ वाटी किसलेले सुके खोबरे, १ ग्लास दूध, ४ वाटी साखर, थोडे काजू आणि बदाम, वेलची पूड, १ छोटा चमचा तूप इ.

coconut barfi recipe

कृती

सर्वप्रथम, शेंगदाणे भाजून त्याची जाडसर पूड करा. त्यात खोबरे आणि वेलची घालून बाजूला ठेवा. आता, मिक्सरमध्ये दूध, साखर आणि सुका मेवा घालून घट्ट पेस्ट बनवा.

coconut barfi recipe

तूप गरम करा

एका पातेल्यात थोडं तूप गरम करा, त्यात शेंगदाणा-नारळाचे मिश्रण घालून हलके परतून घ्या. नंतर, तयार केलेली दुधाची पेस्ट घालून सतत ढवळत राहा. काही मिनिटांतच मिश्रण घट्ट होईल आणि पातेल्याला चिकटणं बंद होईल.

coconut barfi recipe

शेवटची स्टेप

आता ते तेल लावलेल्या ताटावर पसरवा आणि सेट होऊ द्या. थंड झाल्यावर, त्याचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.

coconut barfi recipe

NEXT: अमरावतीजवळची 'ही' सुंदर 8 ठिकाणे फिरण्यासाठी ठरतील बेस्ट, निसर्गसौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

Amravati travel guide | pintrest
येथे क्लिक करा