match fixing exposed in cricket icc charges 8 peoples including 3 indians in uae t10 cricket league  saam tv
Sports

Match Fixing In Cricket: मॅच फिक्सिंग रॅकेटचं भांडं फुटलं! ३ भारतीयांसह ८ लोकांवर ICC ची मोठी कारवाई

Match Fixing Exposed In Cricket: आयसीसीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

Match Fixing Exposed In Cricket:

यूएईत २०२१ मध्ये टी -१० लीग स्पर्धेचा थरार रंगला होता. या लीगमध्ये ३ भारतीयांसह ८ अतिरिक्त लोक आणि काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. आयसीसीकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे.

ज्यात २ भारतीय संघ मालकांचा समावेश आहे. तसेच बांगलादेशचा माजी खेळाडू नासीर हुसेनचा देखील समावेश असल्याचं उघड झालं आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्यांची नावं पराग संगवी आणि कृष्णा कुमार अशी आहेत. हे दोघेही पुणे डेव्हिल्स संघाचे सहमालक आहेत. तसेच फलंदाजी प्रशिक्षक सन्नी ढील्लोचा देखील समावेश आहे.

आयसीसीने या स्पर्धेसाठी ECB ची भ्रष्टाचार विरोधी पथक म्हणून नेमणूक केली होती. आता भ्रष्टाचार विरोधी पथकाने (DACO) हे प्रकरण उघडकीस आणले आहे. (Latest sports updates)

पराग संगवी यांच्यावर सट्टा लावण्याचा तसेच भ्रष्टाचार विरोधी पथकाला सहकार्य न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच सन्नी ढील्लोचा यांच्यावर सामना फिक्स करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह कृष्णा कुमार यांनी या सर्व गोष्टी DACO पासून लपवून ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

१९ दिवसांचा वेळ..

बांगलादेशचा माजी खेळाडू नासीर हुसेनला ७५० डॉलर्स भेट म्हणून मिळाले होते. ही माहिती त्यांनी लपवून ठेवली असा आरोप DACO ने केला आहे. आरोप करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत फलंदाजी प्रशिक्षक अझहर जैदी, व्यवस्थापक शादाब अहमद आणि यूएईचे खेळाडू रिजवान जावेद आणि सलिया समन यांचा समावेश आहे. आयसीसीने ६ खेळाडूंना निलंबित केलं असून आरोपींना उत्तर देण्यासाठी १९ दिवसांचा अवधी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT