Bribe Case: मंत्रालय लाच प्रकरण; नरहरी झिरवळ राजीनामा देणार? मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reacts to Bribery Allegations : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर एसीबीनं छापा मारल्यानं महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
narhari zirwal news
ACB officials conduct action at Minister Narhari Zirwal’s office as CM Devendra Fadnavis responds to resignation demands.Saam tv
Published On
Summary
  • अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक एसीबीच्या कारवाईत अटकेत.

  • मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत एका लिपिकाला अटक केलं होती. यावरून विरोधकांनी थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. या लाचखोरीच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

narhari zirwal news
मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

‘जर उद्या एखादी तक्रार मिळाली तर माझ्याही केबिनमध्ये रेड होईल’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यासोबत त्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली. लाचखोरी प्रकरणात मंत्र्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाहीये, पुरावे असल्यास एसीबी कारवाई करते, असं फडणवीस म्हणाले.

narhari zirwal news
लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

"मी अँटी करप्शन ब्युरोला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलंय. उद्या माझाही कार्यालयात असा कोणी व्यवहार केला तर त्याच्यावर देखील कारवाई होईल. मंत्र्याच्या विरोधात पुरावा असता तर कारवाई झाली असती. कोणतीही कारवाई करण्याआधी एसीबी आधी माहिती घेत असते. त्यावेळचं संभाषणदेखील रेकॉर्ड केलं जातं. त्याच्या नोंदी घेतल्या जातात. आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींमधून मंत्र्यांचं कुठेही नाव आलेलं नसल्याचं फडणवीस म्हणालेत, ते राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लाचखोरीचे प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, या अधिवेशनात यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीत सर्व काही निष्पण होईल, आपण सर्वांना उत्तर देण्यास तयार असल्याचं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कारवाई झालीय. झिरवाळ यांच्या खासगी सचिव रामदास गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com