jasprit bumrah sachin tendulkar google
क्रीडा

Sachin Tendulkar Tweet: बुमराहच्या गोलंदाजीचा मास्टर ब्लास्टरही झाला जबरा फॅन; पोस्ट शेअर म्हणाला...

Sachin Tendulkar On Jasprit Bumrah: नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Praised Jasprit Bumrah:

नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिका १-१ ने ड्रॉ केली आहे. भारतीय संघाने सेंच्युरियनमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करत इतिहास घडवला आहे. भारतीय संघ केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा आशियातील पहिलाच संघ ठरला आहे.

या विजयात मोहम्मद सिराज आणि बुमराहचं मोलाचं योगदान राहिलं आहे. पहिल्या डावात सिराजने ६ तर दुसऱ्या डावात बुमराहने ६ गडी बाद केले.भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जसप्रीत बुमराहचं कौतुक करताना दिसून आला आहे.

भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ' कसोटी मालिका ड्रॉ केल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन. मात्र एडन मार्करमने अप्रतिम फलंदाजी केली. कधी कधी अशा खेळपट्टीवर आक्रमक फलंदाजी करणं हा सर्वोत्तम पर्याय असतो. जसप्रीत बुमराहनेही अप्रतिम गोलंदाजी केली. अशा खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची हे त्याने दाखवून दिलं.' (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला.

या डावात मोहम्मद सिराजने भारतीय संघाकडून सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने १५३ धावा करत ९८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाज करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेला १७६ धावा करत आल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ७९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT