Marry Kom : भारताची सर्वात यशस्वी बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती एमसी मेरी कोमचे नाव देशभरात मोठ्या आदराने घेतले जाते. अलीकडच्या काळात मेरी कोम पुन्हा एकदा चर्चेत होती. पण यावेळेस तिचे खासगी आयुष्य चर्चेचा विषय बनले होते. मेरी कोम आणि तिचा पती करुंग ओन्खोलर कोम (ओनलर) २०२२ मध्ये विभक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये दीर्घकाळ मतभेद होते. त्यातूनच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असा खुलासा मेरी कोमने केला.
मेरी कोमने तिच्या वकिलांच्या मार्फत प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले, 'मी आणि माझा पती करुंग ओन्खोलर वेगळे झालो आहोत. २० डिसेंबर २०२३ रोजी आमचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे.' मेरी आणि तिचा सहकारी हितेश चौधरी यांच्यातील संबंधांबाबत अफवा आणि ऑनलाइन चर्चा जोर धरत होत्या. याच दरम्यान मेरी कोमने घटस्फोटाची माहिती दिली आहे.
निवेदनाद्वारे सुरु असलेल्या चर्चांवर मेरी कोमने स्पष्टीकरण दिले. सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चा खोट्या असल्याचेही तिने सांगितले. कोणत्याही प्रकारच्या प्रेमसंबंधात असल्याचे तिने नाकारले. मी आणि ओनलर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचेही मेरी कोमने सांगितले. आम्ही दोघे जवळपास दोन वर्षांपासून वेगळे राहत आहोत असेही मेरीने निवेदनात म्हटले.
'एम.सी. मेरी कोम आणि करुंग ओन्खोलर (ओनलर) कोम यांच्यात वैवाहिक संबंध उरलेले नाहीत. दोघांनीही २० डिसेंबर २०२३ रोजी दोन्ही कुटुंबाच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत KOM प्रथेनुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. माझ्या क्लायंटचा (मेरी कोम) हितेश चौधरी किंवा इतर कोणासोबतही कोणत्याही प्रकारचा प्रेमसंबंध नाही. या संदर्भातील सर्व गोष्टी खोट्या, चुकीच्या आहेत. या अफवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने पसरवू नये, असे मेरी कोमच्या वकिलांने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.