marnus labuschagne viral video instagram
Sports

Marnus Labuschagne Viral Video: अरे उठ भावा! गाढ झोपेत असलेल्या लाबुशेनची वॉर्नरने खरोखर झोप उडवली; पाहा मजेशीर VIDEO

Cricket Funny Video: दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच मार्नस लाबुशेनसोबत एक मजेशीर प्रसंग घडला आहे

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ४६९ धावा केल्या आहेत.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला २९६ धावा करता आल्या आहेत. दरम्यान दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच मार्नस लाबुशेनसोबत एक मजेशीर प्रसंग घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आले होते. दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर कडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती.

मात्र चौथ्याच षटकात मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. डेव्हिड वॉर्नर केवळ १ धाव करत माघारी परतला. त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये असलेला मार्नस लाबुशेन झोपा काढताना दिसून आला. मात्र वॉर्नरची विकेट पडताच त्याची झोप उडाली. त्यानंतर तो फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला.

पहिल्या डावात मार्नस लाबुशेनला अवघ्या २६ धावा करता आल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने संयमी खेळी करत तिसऱ्या दिवस अखेर नाबाद ४१ धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळीच्या जोरावर तिसऱ्या दिवस अखेर ४ गडी बाद १२३ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव..

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १६३ धावांची खेळी केली.

तर स्टीव्ह स्मिथने १२१ धावांचे योगदान दिले. शेवटी अॅलेक्स कॅरीने तुफानी खेळी करत ४८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT