WTC Final Ind vs Aus : टीम इंडियाकडे अजूनही संधी; चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फिरकी घेणार, कसं असेल गणित?

Ind vs Aus, WTC Final 4th Day Score : टीम इंडियाकडे चौथ्या दिवशी आघाडी घेण्याची संधी असेल, पण कसं होईल हे सर्व शक्य?
Ind vs Aus, WTC Final 4th Day Score Live Updates
Ind vs Aus, WTC Final 4th Day Score Live UpdatesSAAM TV
Published On

India Vs Australia WTC Final Test 4th day Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ओव्हल मैदानावर सुरू आहे. सध्याची परिस्थिती बघता फायनल कोण जिंकणार हे सांगावे लागणार नाही. सध्या ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असले तरी, टीम इंडिया चौथ्या दिवशी बाजी उलटवणार अशी भारतीय क्रीडा चाहत्यांना वाटतंय.

पहिल्या दिवसाचा खेळ झाला त्यावेळी कोण जिंकणार असं कुणालाही विचारलं असतं तर, उत्तर एकच मिळालं असतं. टीम इंडिया! दुसऱ्या दिवशी मात्र, थोडा उत्साह कमी झाला असेल. कारण ऑस्ट्रेलियानं खेळ बदलून टाकला. पण तिसऱ्या दिवशी टीम इंडियानं (Team India) जोरदार कमबॅक केलं आणि पुन्हा भारतीयांच्या उत्साहाला आणि अपेक्षांना उधाण आलं असेल. कारण टीम इंडियाकडे अजूनही जिंकण्याची मोठी संधी आहे.

जिंकले नाहीत, तरी पराभव होणार नाही असंही काही क्रीडाप्रेमींना वाटतं. कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाकडे नेमकी कोणती संधी आहे, हे जाणून घेऊया. (Latest sports updates)

Ind vs Aus, WTC Final 4th Day Score Live Updates
Ind vs Aus WTC Final Day 3 Live Score: रवींद्र जडेजा चमकला; तिसऱ्या दिवसअखेर कांगारूंचे 4 फलंदाज तंबूत परतले

वर्ल्ड कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या (WTC Final) तिसऱ्या दिवशी भारताच्या अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या जोडीने कमालीची फलंदाजी केली. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि अन्य गोलंदाजांनी जबरदस्त मारा केला आणि संघाला कमबॅकची संधी दिली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ४ बाद १२३ धावा झाल्या आहेत.

धावांची गती रोखावी किंवा फलंदाजांना झटपट बाद करावे

चौथ्या दिवशी मार्नस लाबुशेन आणि कॅमरन ग्रीन ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे सुरू ठेवणार आहे. पहिल्या सत्रात विकेट न गमावता जास्तीत जास्त धावा करण्याचा त्यांचा मानस असेल. ऑस्ट्रेलियाकडे सध्या तरी २९६ धावांची आघाडी आहे. या घडीला ती जास्त आहे. तरीही भारताला जिंकण्याची संधी असेल. आजचे पहिले सत्र टीम इंडियासाठी महत्वाचे असेल.

Ind vs Aus, WTC Final 4th Day Score Live Updates
Ajinkya Rahane Batting : ज्याला संघातून काढलं अखेर त्यानेच मैदान मारलं; अजिंक्य रहाणेचं शतक थोडक्यात हुकलं

खेळपट्टीवर चेंडू उसळत आहे. पण त्याबाबत अनिश्चितता आहे. अनेक चेंडू उसळी घेतच नाहीत. तर फिरकीपटूंचे चेंडू वळत आहेत. रविंद्र जडेजाने स्मिथ आणि हेडला जाळ्यात अडकवले. त्यामुळे चौथ्या दिवसाचे पहिले सत्र महत्वाचे असणार आहे. लाबुशेनला बाद करून बाजी उलटवण्याचे आव्हान फिरकीपटूंसमोर आहे. गोलंदाजी प्लाननुसार झाली तर, ऑस्ट्रेलियाला धावा करणं कठीण जाणार आहे आणि हेच टीम इंडियाच्या पथ्यावर पडणार आहे.

जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार

ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या इराद्याने टीम इंडिया चौथ्या दिवशी मैदानात उतरणार आहे. मात्र, सध्या ज्या स्थितीत भारतीय संघ आहे, ते बघता ही शक्यता कमी आहे, पण अशक्य नाही. चौथ्या दिवशी म्हणजेच शनिवारी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, तरच विजयी लक्ष्याकडे वाटचाल होऊ शकते. यात जडेजाची भूमिका महत्वाची ठरणार आहे, ज्याने दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर इंग्लंडला सळो की पळो करून सोडलं होतं.

..तर विजयी दिशेने टीम इंडिया करणार वाटचाल

भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला ३५० ते ३७५ धावांच्या आघाडीसह रोखण्यात यशस्वी ठरले तर, टीम इंडिया उर्वरित दीड दिवसात विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरू शकतात. चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात यायला हवी.

या सत्रात टीम इंडियाला विकेट गमावणे परवडणारे नाही. विकेट गमावल्याच तर एक किंवा दोनपेक्षा अधिक नको, असे सांगितले जात आहे. टीम इंडियाच्या संभाव्य प्लाननुसार सर्व व्यवस्थित घडलं तर, टीम इंडिया ऐतिहासिक विजय मिळवणार हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com