Records Made By Ajinkya Rahane: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. ओव्हलच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता.
तर दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. आता तिसऱ्या दिवशी तुफानी शतकी खेळी करत अजिंक्य रहाणेने जोरदार कमबॅक केलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी स्वस्तात माघारी परतली.
त्यानंतर अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने देखील पॅव्हेलियनची वाट धरली. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजावर आली होती. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली.
त्यानंतर जडेजा बाद होऊन माघारी परतला. मात्र अजिंक्य रहाणेने आपली खेळी तिसऱ्या दिवशीही सुरु ठेवली. त्याने १२९ चेंडूंचा सामना करत ८९ धावांची खेळी केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा पुर्ण...
अजिंक्य रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा पुर्ण केल्या आहेत. असा कारणामा करणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ८३ व्या सामन्यात हा कारणामा केला आहे.
त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. त्याच्या झुंजाज खेळीच्या जोरावर भारतीय संघावर असलेलं फॉलो ऑनचं संकट टळलं आहे.
अजिंक्य रहाणे - शार्दूलची विक्रमी भागीदारी..
अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांनी भारतीय संघाला मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. यासह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरची जोडी ही इंग्लंडमध्ये ७ व्या क्रमांकासाठी शतकी भागीदारी करणारी सहावी जोडी ठरली आहे. शार्दूल ठाकूरने दुसऱ्यांदा ही कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने रिषभ पंत सोबत मिळून १०० धावांची भागीदारी केली होती. (Latest sports updates)
अजिंक्य रहाणेचं दमदार कमबॅक..
खराब कामगिरी करत असल्यामुळे अजिंक्य रहाणेला संघाबाहेर केलं गेलं होतं. तसेच त्याचे उपकर्णधारपद देखील काढून घेण्यात आले होते. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत त्याच्या ऐवजी श्रेयस अय्यरला संधी दिली गेली होती.
मात्र श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर होताच, त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली होती. अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीत स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळताना दमदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर आयपीएल स्पर्धेत त्याच्यावर ५० लाखांची बोली लागली.
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी केली. चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात अजिंक्य रहाणेने मोलाची भूमिका बजावली आहे. ही कामगिरी पाहता त्याला भारतीय संघात संधी दिली गेली आहे. आता मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.