Chandrakant Jagtap
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34,357 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 28,016 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेल्याचा महान खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 27483 धावा केल्या आहेत.
त्यानंतर श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25957 धावा केल्या आहेत.
त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक कॅलिसने 25534 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
या यादीत सहाव्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट हा सध्या खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे जो या यादीत पहिल्या 6 मध्ये आहे. विराटने 25,322 धावा केल्या आहेत.