Manu Bhaker :  Saam tv
Sports

Manu Bhaker : कर्म करा, फळाची चिंता नको; मेडल जिंकल्यानंतर मनू भाकरनं श्रीकृष्ण-अर्जुन आणि भगवद्गीतेचा दिला संदर्भ

Manu Bhaker on bhagavad gita : मनू भाकरने मेडल जिंकल्यानंतर श्रीकृष्ण-अर्जुन आणि भगवद्गीतेचा संदर्भ दिला. मनू भाकरने तिच्या मेहनतीविषयी भरभरून बोलली. तसेच सर्वांचे आभार मानले.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं आहे. नेमबाज मनू भाकरने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये २२.७ स्कोर करत कांस्यपदक जिंकलं. नेमबाजीत पदक जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला ठरली आहे. तसेच पदक जिंकल्यानंतर मनू भाकरनं श्रीकृष्ण-अर्जुन आणि भगवद्गीतेचा संदर्भ दिला.

कांस्य पदक विजेती मनू भाकर म्हणाली, 'मी गीता वाचली आहे. भगवद्गीता वाचल्यानंतर तणावातही शांत राहण्याची संधी मिळाली. मी भगवद्गीता खूप वाचली आहे. माझ्या डोक्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला सल्ला होता, कर्म करा, फळाची चिंता करू नका, असं मनू भाकर म्हणाली'.

'यंदा जास्तीत जास्त पदक जिंकण्याची आशा आहे. पदक माझ्यासाठी स्वप्नासारखं आहे. पदक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे. खेळताना शेवटच्या निशाण्यापर्यंत मैदानात उभी होती. आता कांस्यपदक मिळालंय. दुसरा प्रयत्न आणखी चांगला असेल. टोकियोत झालेल्या स्पर्धेनंतर निराशेच्या छायेत होती. या निराशेतून बाहेर पडायला खूप वेळ लागला. यासाठी खूप मेहनत करावी लागली, असेही तिने सांगितले.

मनू भाकर पुढे म्हणाली, 'क्वालिफिकेशन राऊंड संपला. मला माहीत नाही, काय आणि कसं झालं? आपल्याला फक्त मेहनत घ्यावी लागते. त्यानंतर सर्व काही नशीब आणि देवावर सोडून द्यायचं. मी पुढेही मेहनत करत राहील. पदक जिंकल्यानंतर खूप आनंद होत आहे'. दरम्यान, पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने प्रशिक्षकांच्या नातेवाईकांनीही आभार मानले.

मनू भाकरचं नरेंद्र मोदींकडून कौतुक

मनू भाकरने कांस्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं पहिलं पदक जिंकल्याबद्दल मनू भाकरचं अभिनंदन. तिच्या कांस्यपदकाबद्दल अभिनंदन. ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. ही बाब अविश्वसनीय यश, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

Kamali: कमळी आणि सरोजची होणार तुरुंगात भेट? 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

कल्याण - डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली; शरद पवार गटातील बडा नेता गळाला लागला

SCROLL FOR NEXT