manu bhaker twitter
Sports

Khel Ratna Awards: मनू भाकर, डी गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार; या ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

Khel Ratna And Arjun Awards: मनू भाकर आणि डी गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पाहा सर्व पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंची यादी.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला २ कांस्यपदकं जिंकून देणाऱ्या मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. यासह बुद्धिळपटू डी गुकेशचाही मोठा सन्मान केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की, भारताला दुहेरी पदक जिंकून देणाऱ्या मनू भाकरला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं नाही. मात्र आता या सर्व अफवांना पूर्णविराम देत, मनू भाकरला क्रीडा विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मनू भाकर, डी गुकेशसह आणखी ४ खेळाडूंची खेलरच्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं होतं. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात आणि २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. यासह ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकं जिंकणारी ती पहिलीच महिला भारतीय खेळाडू ठरली होती.

डी गुकेशलाही मिळणार खेलरत्न पुरस्कार

भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेशनेही कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. त्याने १२ डिसेंबर २०२४ रोजी बुद्धिबळपटू क्रीडा प्रकारात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला होता. त्याने या स्पर्धेतील फायनलमध्ये चीनच्या डिंग लिरेनेचा पराभव केला होता. यासह वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन बनला होता.

वयाच्या १८ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन होणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला होता. यापूर्वी कुठल्याही भारतीय बुद्धिबळपटूने इतक्या कमी वयात वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावला नव्हता. यासह ३२ खेळाडूंना अर्जून पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलिट प्रवीण कुमारचा देखील समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT