आयपीएलमध्ये बॉलिवूडचा तडका नसेल तर प्रेक्षकांनाही मजा येत नाही. यासाठी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. याशिवाय क्लोजिंग सेरेमनीमध्ये देखील बॉलिवूड कलाकार परफॉर्मन्स देतात. सामन्यावेळी देखील अनेक अभिनेते त्यांच्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी येतात.
असंच काहीसं इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ११ व्या सामन्यात पाहायला मिळालं. गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगला होता. बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा या मॅचदरम्यान स्डेडियममध्ये दिसली.
मलायका राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये संघ संचालक कुमार संगकाराच्या शेजारी बसलेली दिसली. मलायका अरोरा स्क्रिनवर दिसताच सोशल मीडिया युजर्सही अॅक्टिव्ह झाले. यावेळी त्यांच्याबद्दल विविध चर्चा देखील सोशल मीडियावर रंगल्या होत्या.
रिपोट्सनुसार, मलायका अरोराने नुकतेच तिच्यापेक्षा लहान अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप केलंय. यापूर्वी क्रिकेट पाहण्यासाठी मलायकाला फार क्वचितच चाहत्यांनी पाहिलं असेल. मात्र रविवारी ती क्रिकेट मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. राजस्थान रॉयल्सच्या डगआऊटमध्ये श्रीलंकेचा माजी क्रिकेटर कुमार संगकारासोबत दिसल्यानंतर आता सोशल मीडिया युजर्सने त्या दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केलीये.
दरम्यान या दोघांबद्दल रंगलेल्या या चर्चेला कोणाताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अरोरा सध्या सिंगल आहे. मलायका अरोराने यापूर्वी अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. परंतु 17 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यामुळे आता पुन्हा एकदा मलायकाच्या नव्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.