team india yandex
Sports

Abhishek Sharma : टीम इंडियासाठी सर्वात वाईट बातमी, विस्फोटक फलंदाज रूग्णालयात दाखल

Abhishek Sharma latest health update : टी२० विश्वचषकादरम्यान विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या फिटनेसबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Why Abhishek Sharma was hospitalised during T20 World Cup : टी२० विश्वचषक सुरू असतानाच भारतीय संघासाठी सर्वात वाईट बातमी आली आहे. विस्फोटक सलामी फलंदाज अभिषेक शर्मा आजारी पडलाय. पोटातील इंफोक्शनमुळे अभिषेक शर्माला रात्री अचानक रूग्णालयात अॅडमीट (Abhishek Sharma Hospitalised) कऱण्यात आले आहे. त्यामुळे गुरूवारी होणाऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळण्याची शक्यता धुसूरच आहे. १५ फेब्रुवारी राजी पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज सामना होणार आहे, त्याआधी अभिषेक शर्मा तंदुरूस्त होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Abhishek Sharma latest health update)

दिल्लीमध्ये १२ फेब्रुवारी रोजी भारत आणि नामेबिया यांच्यामध्ये लढत होणार आहे. पाकिस्तानविरोधातील हायव्होल्टेज सामन्याआधी भारतीय टीम संतुलनासाठी हा सामना महत्त्वाचा मानला जातोय. या सामन्यात जसप्रीत बुमराहचे कमबॅक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावऱण होते. पण त्यातच आता अभिषेक शर्मा आजारी पडल्याने टीम इंडियाचे आणि चाहत्यांचे टेन्शन वाढलेय. दिल्लीमधील अरूण जेटली स्टेडियमवर भारत टी२० विश्वचषकातील दुसरा सामना खेळत आहे. पण या सामन्यात अभिषेक शर्माच्या खेळण्यावर शंका आहे.

रेयान टेन डोएशेने दिली अपडेट

भारताचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या पोटाच्या विकाराने त्रस्त आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली होती. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएशे यांनी सांगितलं की, अभिषेकला पोटाचा त्रास आहे, पण तो लवकरच फिट होईल. काही दिवसांत तो मैदानावर खेळताना दिसेल अशी आशा आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बुमराह परतला, वॉशिंग्टन सुंदरही मैदानात -

टीम इंडियाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे फिट झाला आहे. सरावादरम्यान त्याने जबरदस्त वेगाने गोलंदाजी केली. त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवला आपल्या वेगवान चेंडूवर चक्क बोल्ड केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. १० दिवसांच्या विश्रांतीनंतर बुमराह पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतल्याने भारतीय गोटात आनंदाचं वातावरण आहे. दुखापतीमुळे चर्चेत असलेला वॉशिंग्टन सुंदर संघात परतला असून त्याने सरावही सुरू केला आहे. सरावादरम्यान तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासोबत बराच वेळ चर्चा करताना दिसला. त्याने तिलक वर्माला गोलंदाजी करून आपली तयारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेणमधील 35 हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना

Salman Khan : सलमान खानचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक Inactive का झालं? चाहते गोंधळात

Lata Pharande : महिला सरपंचाने केला मोठा घोटाळा, प्रशासनाकडून मोठी कारवाई, साताऱ्यात राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक हरपली; बाजारभावात मोठी पडझड, जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० बंद का झाले? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT