Sikandra Shekh
Sikandra Shekh Saamtv
क्रीडा | IPL

Maharashtra Kesari: शेवटी तो बोललाचं! अन्याय झाला, निर्णय चुकीचा होता? सिकंदर शेखने स्पष्टच सांगितले; यापुढे...

Gangappa Pujari

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडून दोन दिवस झाले मात्र या स्पर्धेची चर्चा अद्याप सुरुच आहे. ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे पैलवान सिकंदर शेख. उपांत्य फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली, या लढतीत सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची चर्चा कुस्ती शौकिनांमधून सुरू झाली आहे. याबद्दल पहिल्यांदाच सिकंदर शेखने प्रतिक्रिया दिली आहे. (Mahatashtra Kesari)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर सिकंदर शेखच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट, आणि स्टोरीज व्हायरल झाल्या होत्या. त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात होती. याबद्दल बोलताना "एक कुस्ती हारली म्हणून मी संपलो नाही, मला जरी पंचांनी चुकीचे गुण दिले असले तरी पुढच्या महाराष्ट्र केसरीची गदा माझ्याकडेच असेल," असा विश्वास सिकंदर शेखने यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना , "माझ्याकडून कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडलेल्या नाहीत. पंचांना धमकी देण्याचे प्रकरण हे धमकी नसून त्यांची फोनवरुन फक्त चौकशी केली आहे, याला आपण चौकशी म्हणू शकत नाही. तसेच पैलवानालाही आपल्या हक्कासाठी बोलण्याचा अधिकार आहे. यापुढेही मी लढत राहीन," अशी गर्जनाही त्याने यावेळी केली आहे.

दरम्यान, ६५ व्या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यांचा थरार पुण्यात (Pune) पार पडला. अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत मानाची चांदीची गदा उंचावली. या स्पर्धेत हरल्यानंतरही सोशल मीडियावर सिकंदर शेखचे जोरदार कौतुक करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्यावर अन्याय झाल्याचेही बोलले जात होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding News | मृतांना 5 लाख जखमींना उपचार, घाटकोपर दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

Ghatkopar Hoarding News | मुख्यमंंत्री ऑन फिल्ड! घाटकोपर दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्र्यांची भेट

Lok Sabha Election 2024 : राज्यात चौथ्या टप्प्यात ५२.४९ टक्के मतदान; शिरूरमध्ये सर्वात कमी, तर या मतदारसंघात सर्वाधिक मतदान

Maharashtra Politics: शिरूर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, कोल्हेंनी VIDEO शेअर करत केला गंभीर आरोप

Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत जाहीर, मुंबईतल्या सर्व होर्डिंगचे होणार ऑडिट: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT