team india twitter
क्रीडा

T20 WC: रोहित शर्मासह मुंबईतील 3 खेळाडू घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, वर्ल्ड चॅम्पियन्सला मिळणार प्रत्येकी 1 कोटींचं बक्षीस

Ankush Dhavre

भारतीय संघाने १७ वर्षांनंतर दुसऱ्यांदाच टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. यापूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. आता दुसऱ्यांदा ही ट्रॉफी उंचावल्यानंतर खेळाडूंसह फॅन्सने एकच जल्लोष केला.

भारतीय संघ मायदेशात परतल्यानंतर आधी राजधानी दिल्लीत आणि त्यानंतर आर्थिक राजधानी मुंबईत विजयाचा जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान भारताच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील ४ खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ जुलैला भारतीय खेळाडूंना भेटीसाठी बोलावलं आहे. या भेटीसाठी वर्ल्डकप विजेत्या संघातील ४ खेळाडूंचा समावेश आहे. ज्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. हे चारही खेळाडू महाराष्ट्रातील असून, मुंबईमध्येच राहतात. या भेटीचा कार्यक्रम आज संध्याकाळी ४ वाजता विधानसभेत पार पडणार आहे. या कार्यक्रमात चारही खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रत्येकी १-१ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

नरेंद्र मोदींची घेतली भेट

भारतीय संघातील खेळाडूंनी २९ जूनला बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यानंतर १ जूलैला भारतीय संघातील खेळाडू भारतात येण्यासाठी निघणार होते. मात्र बारबाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय खेळाडू येऊ शकले नव्हते. त्यानंतर ३ जूलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता भारतीय खेळाडू भारतात येण्यासाठी बारबाडोसहून रवाना झाले. एअर इंडियाचं स्पेशल चार्टर्ड विमान ४ जुलैला भारतीय खेळाडूंना घेऊन दिल्लीत लँड झालं.

दिल्ली विमानतळावर खेळाडूंनी विजयाचा जल्लोष केला. त्यानंतर हे खेळाडू ICT Maurya हॉटेलमध्ये गेले. इथे काही वेळ विश्रांती केल्यानंतर भारतीय खेळाडू १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी रवाना झाले. मोदींची भेट घेतल्यानंतर खेळाडूंनी मुंबईची वाट धरली. मुंबईत आल्यानंतर भारतीय संघाची विजयी परेड पार पडली. वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयकडून खेळाडूंना १२५ कोटींचा धनादेश देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

Assembly Election: 'हरियाणा, काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकणार, महाराष्ट्रातही असंविधानिक सरकार पडणार', काँग्रेसला विश्वास

Marathi News Live Updates : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

Maharashtra Politics : राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

Yoga: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT