Surabhi Jayashree Jagdish
भाजीमध्ये चव, सुगंधासाठी योग्य घटक वापरणं फार महत्त्वाचं असतं. सुकं खोबरं अनेक पारंपरिक भाज्यांमध्ये छान लागतं, पण काही भाज्यांमध्ये ते घातल्यास भाजी बेचव, जड किंवा मूळ चव हरवलेली वाटू शकते.
दुधी भोपळा खूप पाणीदार आणि सौम्य चवीची असते. सुकं खोबरं घातल्यावर भाजी कोरडी होते. त्याची नैसर्गिक हलकी चव पूर्णपणे दबून जाते.
दोडका मऊ आणि पचायला हलका असतो.सुकं खोबरं घातल्यास भाजी चिकट आणि बेचव होते.
कारल्याची कडू चव संतुलित ठेवणं महत्त्वाचं असतं. सुकं खोबरं घातल्याने कडूपणा अधिक लागतो. त्यामुळे भाजी खाण्यास कडू वाटू शकते.
कोबीची स्वतःची सौम्य गोडसर चव असते. सुकं खोबरं घातल्यावर ती चव दबून जाते.
फुलकोबीची चव मसाल्यांशी सहज जुळते. सुकं खोबरं घातल्यास भाजी तेलकट होते. त्याऐवजी टोमॅटो किंवा साधे मसाले जास्त छा लागतात.
टोमॅटो रसाळ आणि आंबट-गोड चवीचा असतो. सुकं खोबरं घातल्यावर भाजी बेचव होते. टोमॅटोच्या ताजेपणावर त्याचा परिणाम होतो.