PBKS VS LSG
PBKS VS LSG Saam Tv
क्रीडा | IPL

PBKS VS LSG Match Result: लखनऊचे 'नवाब' पडले पंजाबच्या 'वाघांवर' भारी! पराभवाचा बदला घेत मिळवला ५६ धावांनी विजय

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३८ वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने जोरदार कामगिरी करत ५६ धावांनी विजय मिळवला आहे.

यासह गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. या सामन्यात पंजाब किंग्जला विजयासाठी २५८ धावांची गरज होती. मात्र पंजाब किंग्ज संघाला २०१ धावा करता आल्या.

लखनऊने उभारला २५७ धावांचा डोंगर

या सामन्यात लखनऊचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांवर तुटून पडले होते. कर्णधार केएल राहुल १२ धावा करत माघारी परतला. मात्र काइल मेयर्सने तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली होती. त्याने ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार अन् ५ षटकार मारले. तर निकोलस पुरनने ४५ आणि युवा फलंदाज आयुष बदोनीने ४३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद २५७ धावा केल्या.

पंजाबचा संघ ठरला अपयशी..

लखनऊ संघाने या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी २५८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीवीर फलंदाजांची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर अथर्व तायडेने अप्रतिम फलंदाजी करत सर्वांची मन जिंकली. त्याने या डावात ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. (PBKS VS LSG Match Result)

तर सिकंदर रजाने ३६ धावांचे योगदान दिले. मात्र इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या फलंदाजांना सातत्य टिकवून ठेवता आले नाही. त्यामुळे घरच्याच मैदानावर पंजाब संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Latest sports updates)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या

लखनऊ सुपर जायंट्स संघाने केलेली धावसंख्या ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. लखनऊ संघाने २५७ धावा केल्या आहेत. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २६३ धावांचा डोंगर उभारला होता. (pbks vs lsg Match Highlights)

दोन्ही संघाची प्लेइंग ११:

पंजाब किंग्ज: अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग

लखनऊ सुपर जायंट्स :

केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, आवेश खान, यश ठाकूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT