RCB VS RR Match Details: टेबल टॉपर राजस्थानला RCB चे आव्हान! विराट कोहली आजही करणार RCB चे नेतृत्व?

RCB VS RR Match Preview: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
rcb vs rr
rcb vs rrsaam tv

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. एम चिन्नास्वामीच्या मैदानावर आज दुपारी ३:३० वाजता हा सामना रंगणार आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला राजस्थान रॉयल्स संघ हा सामना जिंकून आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुणतालिकेत वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

rcb vs rr
Arshdeep Singh Wickets Video: नाद करा पण अर्शदीपचा कुठं! सलग २ चेडूंवर स्टंपचे केले २ तुकडे पाहा VIDEO

गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा सामना जिंकून सलग दुसऱ्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्ज संघावर २४ धावांनी विजय मिळवला होता.

कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली दोघेही जोरदार फॉर्ममध्ये आहेत. जर राजस्थानला हा सामना जिंकायचा असेल तर या दोघांना थांबवणं अतिशय गरजेचं असणार आहे.

rcb vs rr
MS Dhoni On Retirement: MS Dhoni लवकरच IPL ला करणार गुड बाय! थरारक विजयानंतर दिले निवृत्तीचे संकेत

हेड टू हेड रेकॉर्ड..(RCB VS RR Head To Head Record)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण २८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाने १२ वेळेस बाजी मारली आहे. तर ३ सामने हे अनिर्णीत राहिले आहेत.

rcb vs rr
MS Dhoni On Retirement: MS Dhoni लवकरच IPL ला करणार गुड बाय! थरारक विजयानंतर दिले निवृत्तीचे संकेत

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11 (RCB VS RR Playing 11) :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB Playing 11) :

विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals Playing 11) :

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जोरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com