हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारी इतिहास घडला. १६६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत १६६ धावांचं आव्हान गाठलं. या पराभवासह लखनऊच्या नेट रनरेटमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे लखनऊचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. दरम्यान लखनऊच्या दारुण पराभवानंतर संघमालक संजीव गोएंका आणि केएल राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लखनऊला हा सामना १० गडी राखून गमवावा लागला आहे. एक फॅन म्हणून आणि संघमालक म्हणून नक्कीच संजीव गोएंका यांना वाईट वाटलं असेल आणि संतापही आला असेल. एकीकडे संजीव गोएंका ओरडताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे कर्णधार केएल राहुल शांत राहून उत्तर देताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संजीव गोएंकाला झापलं आहे. अनेकांनी अस म्हटलं आहे की, संघमालकाने आपल्या खेळाडूला अशी वागणूक नाही दिली पाहिजे. तर काहीचं म्हणणं आहे की, जर केएल राहुलकडून काही चुका झाल्या असतील तर त्याला एका रूममध्ये बसवून त्याच्याशी चर्चा करायला हवी होती. लाईव्ह सामन्यात असं वागणं चुकीचं आहे.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने २० षटक अखेर १६५ धावा केल्या.
यादरम्यान आयुष बदोणीने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर निकोलस पुरनने ४८ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. तर दुसरीकडे केएल राहुलने कसोटी स्टाईल फलंदाजी केली. टी -२० क्रिकेटमध्ये त्याने ३३ चेंडूत २९ धावा केल्या. यासह लखनऊने २० षटक अखेर १६५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने मिळून एकतर्फी विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.