हैदराबादमध्ये मंगळवारी ( ७ मे) जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या सामन्यातही पाऊस पडला, मात्र चौकार षटकारांचा. हैदराबादचा संघ या हंगामात आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातोय. लखनऊच्या नवाबांचंही त्यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने स्वागत केलं. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटक अखेर १६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने १० गडी राखून विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. लखनऊ सुपर जायंट्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. २० षटकअखेर लखनऊ सुपर जायंट्स संघाला १६५ धावा करता आल्या. सलामीला आलेल्या केएल राहुलने २९ धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉकने २, मार्कस स्टोइनिसने ३, कृणाल पंड्याने २४ धावांची खेळी केली. शेवटी निकोलस पुरनने ४८ धावांची खेळी केली आणि आयुष बदोनीने ५५ धावा करत संघाची धावसंख्या १६५ धावांपर्यंत पोहचवली.
सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी १६६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांची जोडी मैदानावर आली होती. दोघांनी लखनऊच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. ट्रेविस हेडने ३० चेंडूंचा सामना करत नाबाद ८९ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने नाबाद ७५ धावांची खेळी केली. हैदराबादने हा सामना १० गडी राखून आणि ६२ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.