Suryakumar Yadav saam tv
Sports

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचं पुन्हा नशीब चमकलं! मिळाली टी-२० टीमची कॅप्टन्सी, आता दोन ट्रॉफी जिंकण्याचं लक्ष्य

Suryakumar Yadav News: टी-२० वर्ल्डकप विजयानंतर सूर्यकुमार यादव पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड झाली असून, नव्या हंगामात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाला २०२६ च्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आता सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालाय. येत्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या दोन्ही स्पर्धांसाठी मुंबई टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यात आलीये. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वरिष्ठ निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, या संपूर्ण सिझनमध्ये सूर्यकुमार मुंबई टीमचं नेतृत्व करणार आहे.

गेल्याच महिन्यात सूर्यकुमारला मुंबईच्या रणजी टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्याने संपूर्ण देशांतर्गत सिझनसाठी आपण उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. पण निवड समितीने त्याचा रणजी टीममध्ये समावेश केला नाही. अलीकडच्या काळात सूर्यकुमारने टेस्ट सामने खेळलेले नाहीत असं कारण त्यावेळी सिलेक्टर्सने दिलं होतं. मात्र आता २० ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडे मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलीये.

14 नोव्हेंबरपासून सुरू होणार मुंबईची लढाई

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. या स्पर्धेत मुंबईची एलिट 'ड' ग्रुपमध्ये आहे. या गटात मुंबईसोबत हैदराबाद, छत्तीसगड, गोवा, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड आणि विदर्भ या टीम्सचाही समावेश आहे. मुंबईचा पहिला सामना हैदराबादविरुद्ध रंगणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ निवड समितीने यंदाच्या सिझनमधील दोन्ही मर्यादित ओव्हर्सच्या स्पर्धांसाठी सूर्यकुमारची कर्णधार म्हणून निवड केलीये. टीम निवडण्यापूर्वी ७ आणि ९ नोव्हेंबरला सराव सामने खेळवले जाणार आहेत. ९ नोव्हेंबरलाच मुंबईची फायनल टीम जाहीर होणार आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरला खेळाडू कोलकात्यासाठी रवाना होणार आहेत.

टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर दिली नवी जबाबदारी

सूर्यकुमार यादवसाठी यंदाचा हा सिझन खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० वर्ल्डकप विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे सूर्याचा हा अनुभव मुंबईच्या टीमच्या कामी येणार आहे. सूर्या त्याच्या आक्रामक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकवून देण्याची सूर्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

प्रेसिडेंट कपमधूनही केलेलं क्रिकेटमध्ये कमबॅक

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर सूर्यकुमारने देशांतर्गत क्रिकेटमध्येही कमबॅख केलं होतं. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एमसीए प्रेसिडेंट कप टी-२० स्पर्धेत तो एमआयजी क्रिकेट क्लबकडून खेळला होता. या स्पर्धेत खेळून त्याने पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभाग घेतला.

आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फलंदाजीने चांगली कामगिरी करण्यासोबतच कर्णधार म्हणून मुंबईला विजेतेपद मिळवून देण्याचे त्याचे लक्ष्य असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang War: पुण्याचं होतंय 'गँग्ज ऑफ वासेपूर'; गोळ्या झाडून मेला नाही म्हणून कोयत्यानं वार

दारूड्यांसाठी सरकारची अनोखी योजना; दारू पिण्याआधी होणार मेडिकल टेस्ट

Vaibhav Suryavanshi: क्रिकेटचं ऐतिहासिक 'वैभव' परतलं; वैभव सूर्यवंशीच्या 52 चेंडूत 204 धावा

Thursday Horoscope: आज 3 राशींच्या आयुष्यात घडणार आनंददायी बदल, तर काहींना कामाच्या ठिकाणी नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार

हृदयविकार, BP, डाय़बेटीजची बनावट औषधं; FDA कडून बनावट कारखान्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT