LSG vs PBKS, IPL 2025 Pitch रिपोर्ट  saam Tv
Sports

LSG vs PBKS, IPL 2025: आयपीएलच्या १३ व्या सामन्यात पाऊस पडेल? जाणून घ्या लखनौचा हवामान आणि एकाना स्टेडियमचा Pitch रिपोर्ट

LSG vs PBKS, IPL 2025: आयपीएल २०२५ मधील १३ वा सामना आज होणार आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब सुपरकिंग्समध्ये होणार आहे. सामन्यापूर्वी खेळपट्टी, हवामान रिपोर्ट जाणून घेऊ.

Bharat Jadhav

इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधील १३ वा सामना लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) पंजाब किंग्स (पीबीकेएस) यांच्यात होणार आहे. हा सामना एलएसजीच्या होम ग्राउंड म्हणजेच लखनौतील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली पंजाब किंग्सने मागील सामने जिंकलेत. त्यामुळे आजच्या सान्यात कोण बाजी मारणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.

या दोन संघांमधील सामना या हंगामातील सर्वात महत्त्वाचा सामना असेल, कारण त्यात सर्वात महागडे खेळाडू एकमेकांशी भिडणार आहेत. लखनौ संघाचा कर्णधार ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. तर पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला २७ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले आहे.

कसा आहे एकाना क्रिकेट स्टेडियमचा पिच रिपोर्ट

हे स्टेडियम हे भारतातील मोठ्या मैदानांपैकी एक आहे. आजचा सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळला जाईल. येथील खेळपट्टी मैदानाच्या मध्यापासून थोडीशी बाहेर आहे. त्यामुळे गोलंदाजांना छोट्या बाजूपासून बचाव करणे कठीण होईल. दुसरीकडे ही खेळपट्टी फिरकीपटूंनासाठी फायदेशीर आहे.

फिरकीपटूंना चेंडूला स्पिन करण्यात यश येईल. त्यामुळे फलंदाजांना शॉट्स वेळेवर मारण्यात अडचणी येतील. चेंडू बॅटवर व्यवस्थित येणार नाहीत. त्यामुळे फलंदाज झेलबाद होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजांना मधल्या षटकांमध्ये स्ट्राइक रोटेट करावे लागेल. पॉवरप्लेचा फायदा घ्यावा लागेल. या पिच बाबत लखनौचा अष्टपैलू खेळाडू शहाबाज अहमद म्हणाला, हे स्टेडियम भारतातील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. या स्टेडियमवर गोलंदाजांना अधिक मदत मिळते. परंतु फलंदाज आणि गोलंदाज यांनाही या खेळपट्टीचा फायदा होईल.

लखनौचा हवामान अहवाल

अ‍ॅक्यूवेदरच्या वृत्तानुसार, सामन्याच्या सुरुवातीला लखनौमध्ये तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस असेल. तर सामन्याच्या शेवटी तेथील तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. सामन्यादरम्यान आर्द्रता १२% ते १७% च्या दरम्यान राहील. संपूर्ण सामन्यात पावसाची शक्यता नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT