IPL 2025: २७ कोटीवाला ऋषभ की २६ कोटीवाला श्रेयस, कोण ठरणार सरस?

Rishabh Pant vs Shreyas Iyer: यंदाच्या आयपीएलमध्ये दोन खेळाडूंना मोठ्या किंमतींवर खरेदी करण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंवर ५३.७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
IPL 2025
Rishabh Pant vs Shreyas IyerSaam Tv
Published On

आयपीएलमधील दोन महागडे खेळाडू आज भिडणार आहेत. या दोन्ही खेळाडूंवर तब्बल ५३ कोटी रुपये खर्च करण्यात आली आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतके महागडे खेळाडू नेमके कोण? हे दोन महागडे प्लेअर आहेत, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर. हे दोघे आयपीएल २०२५ मधील सर्वात महागडे खेळाडू आहेत. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना विकत घेतले आहे. तर पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे.

आज १ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ चा १३ वा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये होणार आहे. या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात महागडे खेळाडू एकमेकांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू आपल्याला संघाचे कर्णधार आहेत. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करत आहे. तर श्रेयस अय्यर पंजाब किंग्स संघाचा कर्णधार आहे.

IPL 2025
IPL 2025 Points Table: मुंबईच्या एका विजयानं मोठी उलटफेर; Points Tableमध्ये चार अंकांची भरारी

पहिल्या सामन्यात पंत अपयशी

लखनौच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर कर्णधार असलेल्या ऋषभ पंतला या सामन्यात साधं खातं देखील उघडता आले नव्हते. पण त्याला तब्बल २७ कोटी रुपये खर्चन खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पहिल्या पराभवाचा बदला घेत लखनौच्या संघाने सनराझजर्स हैदराबादच्या संघाला त्यांच्याच घरात मात दिली होती.

IPL 2025
MI vs KKR: बोल्टने केला बोल्ड! यॉकर टाकत सुनील नरेनचा उडवला त्रिफळा; वानखेडेवर बोल्टचा कहर Video Viral

श्रेयस अय्यरनं पहिल्याच सामन्यात ठोकलं अर्धशतक

पंजाब किंग्सचा आयपीएल २०२५ मधील पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होता. या सामन्यात ११ धावांनी पंजाबचा विजय झाला. या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू श्रेयस अय्यरने नाबाद खेळी केली. श्रेयसने ४२ चेंडूमध्ये ९७ धावांची तुफानी खेळी केली होती.

आयपीएल २०२५मधील दोन सर्वात महागडे खेळाडू प्रथमच भिडणार आहेत. परंतु या दोघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीमध्ये श्रेयस अय्यरचा फॉर्म जबरदस्त दिसत आहे. तर ऋषभ पंतचा फॉर्म काहीसा कमी दिसत आहे. मात्र, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवीन असतो. त्यामुळे आज कोण स्वत:ला सर्वोत्कृष्ट सिद्ध करतो, हे पाहावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com