आयपीएल २०२४ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या (३० एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा ४ गडी राखून पराभव झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १४४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने १९.२ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या पराभवानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला? जाणून घ्या.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आलेला हार्दिक पंड्या गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान पराभवानंतर बोलताना तो म्हणाला की, ' मला तरी वाटतं की, फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर या स्थितीतून बाहेर पडणं कठीण आहे. आमच्यासोबतही असच काहीतरी घडलं. आम्हाला ज्या चेंडूवर फटकेबाजी करायची होती, ते आम्ही मिस केले आणि बाद झालो. मला अजूनही विश्वास आहे की, आम्ही पुन्हा दमदार कमबॅक करू शकतो. त्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागेल. या सामन्यातून खूप काही शिकण्यासारखं होतं.'
तसेच नेहाल वढेराबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मला वाटतं की, त्याने गेल्या हंगामातही शानदार कामगिरी केली होती. त्याला सुरुवातीला संधी मिळाली नव्हती. मात्र त्याला आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. लवकरच तो भारतीय संघासाठी खेळणार.'
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. मुंबईकडून फलंदाजी करताना नेहाल वढेराने सर्वाधिक ४६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १४४ वर पोहचवली. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने हे आव्हान १९.२ षटकात पूर्ण केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.