LSG VS GT x
Sports

LSG VS GT : तूच रे... झहीर खानने सांगितलं सिक्रेट अन् रवी बिश्नोईने घेतली साई सुदर्शनची विकेट

Zaheer Khan : लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्यात गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन लखनऊसाठी डोकेदुखी बनला होता. टाइम आउटमध्ये झहीर खानने रवी बिश्नोईला प्लान सांगितला आणि बिश्नोईने ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर साईला कॅचआउट केले.

Yash Shirke

LSG VS GT IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यामध्ये गुजरातच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. साई सुदर्शन आणि शुबमन गिल सुरुवातीचे ओव्हर्स उत्तमरित्या खेळले. १० व्या ओव्हरपर्यंत गुजरातची धावसंख्या १०० पार गेली होती. शुबमन गिल ६० धावांवर बाद झाला. त्यानंतर ५६ धावांवर साई सुदर्शन कॅचआउट झाला. साई सुदर्शनच्या विकेटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

गुजरातची चांगली सुरुवात झाली. साई सुदर्शन आणि शुबमन गिल टिकून खेळत होते. गिल आउट झाल्यानंतर साई आक्रमक खेळत होता. साई सुदर्शनला रोखण्यासाठी लखनऊचे गोलंदाज प्रयत्न करत होते. पण इन-फॉर्म साई सुदर्शन आउट होत नव्हता. अशा वेळी लखनऊ संघाचा प्रशिक्षक झहीर खान मदतीला धावला.

स्ट्रेटेजिक टाइम आउटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक झहीर खान मैदानातील खेळाडूंशी चर्चा करायला आला. झहीरने गोलंदाजांना खास करुन रवी बिश्नोईला काहीतरी सांगितले. टाइम आउट दरम्यान साईला बाद करण्याचा प्लान करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कारण टाइम आउट झाल्यानंतर जेव्हा रवी बिश्नोई गोलंदाजी करायला आला. तेव्हा बिश्नोईने टाकलेल्या पहिल्याच बॉलवर साई सुदर्शन कॅचआउट झाला. त्यानंतर बिश्नोईने झहीरकडे पाहून त्याला धन्यवाद म्हटले. झहीर खान थम्स अप करत हसला. हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

गुजरात टायटन्सची प्लेइंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग ११ -

एडन मार्कराम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, रवी बिश्नोई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT