LSG vs DC IPL 2024 lucknow super giants vs delhi capitals live updates amd2000 twitter
क्रीडा

LSG vs DC, IPL 2024: आयुष बदोनी बनला लखनऊसाठी संकटमोचक! दिल्लीसमोर ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकअखेर १६७ धावा केल्या आहेत.

या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊला क्विंटन डीकॉक स्वरुपात पहिला धक्का बसला. क्विंटन डी कॉक १९ धावांवर बाद होऊन माघारी परतला. तर केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कल ३, मार्कस स्टोइनिस ८, निकोसल पूरन शून्यावर बाद होऊन परतला. शेवटी युवा फलंदाज आयुष बदोनी ने ३५ चेंडूंचा सामना करत नाबाद ५५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १६७ धावांवर पोहचवली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग ११..

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन, आयुष बदोनी, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, रिषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क इशांत शर्मा, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT