LSG vs DC, IPL 2024 Saam Digital
Sports

LSG vs DC, IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने लखनौचा 6 गडी राखून केला पराभव; ऋषभ पंतच्या संघाचा दुसरा विजय

LSG vs DC : आयपीएल 2024 च्या 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपरजायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 16४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दिल्लीने केवळ 18.1 षटकांत 4 गडी गमावून विजयाला गवसणी घातली.

Sandeep Gawade

आयपीएल 2024 च्या 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपरजायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 16४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दिल्लीने केवळ 18.1 षटकांत 4 गडी गमावून विजयाला गवसणी घातली. दिल्लीच्या विजयात कुलदीप यादवच्या गोलंदाजीने मोलाचं योगदान दिलं. फ्रेझर मॅकगर्क आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी धमाकेदार खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सचा हा या मोसमातील दुसरा विजय आहे.

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकअखेर १६७ धावा केल्या होत्या.

दिल्लीच्या विजयात कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी केली. या चायनामन गोलंदाजाने 4 षटकात केवळ 20 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीप यादवने केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. यानंतर पहिला सामना खेळणाऱ्या जॅक फ्रेजर मॅकगर्कने अवघ्या 35 चेंडूत 55 धावांची खेळी केली. ऋषभ पंतनेही 24 चेंडूत 41 धावा केल्या. पृथ्वी शॉने 32 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊला क्विंटन डीकॉक स्वरुपात पहिला धक्का बसला. क्विंटन डी कॉक १९ धावांवर बाद होऊन माघारी परतला. तर केएल राहुलने ३९ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कल ३, मार्कस स्टोइनिस ८, निकोसल पूरन शून्यावर बाद होऊन परतला. शेवटी युवा फलंदाज आयुष बदोनी ने ३५ चेंडूंचा सामना करत नाबाद ५५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १६७ धावांवर पोहचवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT