Reece Topley Catch: रिस टोप्लीचा 'टॉप क्लास' कॅच! पाहून रोहितही झाला शॉक- Video

Reece Topley Catch Video: वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
Reece Topley Catch: रिस टोप्लीचा 'टॉप क्लास' कॅच! पाहून रोहितही झाला शॉक- Video
Reece Topley to stunning catch of rohit sharma in mi vs rcb match watch video amd2000twitter

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना रिस टोप्लीने डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिस टोप्लीने टिपलेला हा झेल पाहुन रोहित शर्मा देखील शॉक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

तर झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशनची जोडी मैदानावर आली होती. रोहित शर्मा स्ट्राईकवर असताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून १२ वे षटक टाकण्यासाठी विल जॅक्स गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहितने स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

हा चेंडू फाइन लेगच्या दिशेने ४ धावांसाठी जाणार होता. इतक्यात फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रिस टोप्लीने डाइव्ह मारत एका हाताने भन्नाट झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Reece Topley Catch: रिस टोप्लीचा 'टॉप क्लास' कॅच! पाहून रोहितही झाला शॉक- Video
LSG vs DC, IPL 2024: लखनऊला हरवण्यासाठी दिल्लीच्या संघात होणार मोठा बदल? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबईचा शानदार विजय...

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला २० षटकअखेर १९६ धावा करता आल्या. या संघाकडून फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिकने अर्धशतकी खेळी केली.

तर मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. मुंबई इंडियन्सकडून या धावांचा पाठलाग करताना इशान किशनने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ५२ धावा चोपल्या. सलामीला आलेल्या रोहित शर्माने ३८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com