lsg owner sanjeev goenka invites kl rahul for dinner photo viral on social media amd2000 twitter
क्रीडा

KL Rahul: संजीव गोयंका अन् केएल राहुलच्या भेटीचा तो फोटो व्हायरल! भेटीत नेमकं काय घडलं?

Ankush Dhavre

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ लखनऊ सुपरजायंट्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला संजीव गोयंका यांच्या घरी एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका देखील हजर होते. यादरम्यान संजीव गोयंका यांनी लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलला मिठी मारली. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यापूर्वी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाला सनरायझर्स हैदराबादकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. ही सुमार कामगिरी पाहून संघमालक संजीव गोयंका यांना राग अनावर झाला आणि त्यांनी सामन्यानंतर भर मैदानात केएल राहुलला सुनावलं. त्यांच्या बोलण्यावरुन ते संघाच्या कामगिरीवर भडकल्याचे पाहायला मिळाले होते.

सनरायझर्स हैदराबाविरुद्धच्या सामन्यानंतर संजीव गोयंका आणि केएल राहुलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर केएल राहुल लखनऊ सुपरजायंट्स संघाचं कर्णधारपद सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. दोघांमध्ये मतभेद असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या भेटीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

लखनऊचा लाजिरवाणा पराभव..

तर झाले असे की, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजांयट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १६५ धावा केल्या. यादरम्यान केएल राहुलने ३३ चेंडूंचा सामना करत २९ धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी १६६ धावांची गरज होती.

हैदराबादच्या खेळपट्टीवर इतक्या धावा आव्हानात्मक होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना हैदराबादने ९.४ षटकात सामना जिंकला. हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने शानदार अर्धशतकी खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. दरम्यान सामन्यानंतर केएल राहुलच्या कासवगती खेळीवर टिकेचा वर्षाव केला गेला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT