KL Rahul- Sanjiv Goenka: केएल राहुलचा अपमान करणं महागात पडलं! LSG च्या मालकांवर क्रिकेट एक्सपर्ट भडकले

Cricket Experts On Sanjiv Goenka: संघाच्या दारुण पराभवानंतर लखनऊचे संघमालक मैदानावरच केएल राहुलवर संताप व्यक्त करताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
KL Rahul- Sanjiv Goenka: केएल राहुलचा अपमान करणं महागात पडलं! LSG च्या मालकांवर क्रिकेट एक्सपर्ट भडकले
cricket experts criticize sanjiv goenka after he gets angry on kl rahul during srh vs lsg match amd2000twitter
Published On

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. १६६ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने ६२ चेंडू आणि १० गडी राखून विजय मिळवला. संघाच्या दारुण पराभवानंतर लखनऊचे संघमालक मैदानावरच केएल राहुलवर संताप व्यक्त करताना दिसून आले. पोस्ट मॅचसाठी जेव्हा सर्व खेळाडू मैदानावर होते, त्यावेळी संजीव गोयंका रागात असल्याचं दिसून आलं.

या सामन्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, संजीव गोयंका संताप व्यक्त करताना दिसून येत आहे. तर केएल राहुल नम्रपणे उत्तर देताना दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकरी संताप व्यक्त करताना दिसून आले आहे. क्रिकेट एक्सपर्ट्सने देखील संजीव गोयंकाच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

KL Rahul- Sanjiv Goenka: केएल राहुलचा अपमान करणं महागात पडलं! LSG च्या मालकांवर क्रिकेट एक्सपर्ट भडकले
IPL 2024, Points Table: लखनऊच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला दणका! बनला स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ

संजीव गोयंकावर क्रिकेट एक्सपर्ट भडकले...

जियो सिनेमावर बोलताना क्रिकेट एक्सपर्ट म्हणाले की, 'या सर्व गोष्टी बंद दरवाजा आड व्हायला हव्या. स्टेडियममध्ये कितीतरी कॅमेरा असतात. या कॅमेऱ्यातून काहीच लपत नाही. तुम्हाला चांगलंच माहित आहे की, केएल राहुल आता पत्रकार परिषदेत जाणार आणि संभावितरित्या त्याला सांगावं लागेल की, नेमकी काय चर्चा झाली होती.'

KL Rahul- Sanjiv Goenka: केएल राहुलचा अपमान करणं महागात पडलं! LSG च्या मालकांवर क्रिकेट एक्सपर्ट भडकले
SRH vs LSG, IPL 2024: लखनऊचे मालक लाईव्ह सामन्यात केएल राहुलवर भडकले; Video तुफान व्हायरल

काही दिवसांपूर्वीच टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात केएल राहुलला स्थान दिलं गेलं नव्हतं. बीसीसीआयच्या या निर्णयावर क्रिकेट फॅन्सने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्याच्या स्ट्राईक रेटचीही जोरदार चर्चा झाली. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यातही तो संघर्ष करताना दिसून आला. या सामन्यात त्याने ८७.८८ च्या सरासरीने ३३ चेंडूत अवघ्या २९ धावा केल्या .

या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून निकोलस पुरनने ४८ आणि आयुष बदोनीने ५५ धावांची खेळी करत संघाला १६५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडून ट्रेविस हेडने नाबाद ८९ तर अभिषेक शर्माने ७५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com