लवलिनाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र देशासाठी कांस्यपदक जिंकलं  Saam Tv
Sports

लवलिनाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र देशासाठी कांस्यपदक जिंकलं

टोकियो भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन ही आज झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटात उपांत्य लढतीमध्ये पराभवाचा सामना तिला करावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tokyo Olympics : टोकियो Tokyo भारताची India आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन ही आज झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटात उपांत्य लढतीमध्ये पराभवाचा सामना तिला करावा लागला आहे. तिला तुर्कस्थानच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेली कडून पराभव व्हावा लागला आहे. यामुळे अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकाकरिता दावेदारी सादर करण्याचे लवलिनाचे स्वप्न आज भंगले गेले आहे.

आज झालेल्या उपांत्य लढती मध्ये लवलिना ही अपेक्षेनुसार चांगल्या प्रकारचा खेळ करता आला नाही. विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेली ही पहिल्या फेरीपासून प्रतिस्पर्धी लवलिनावर वर्चस्व राखून ठेवली होती. अखेर तिन्ही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत बुसेनाज सुरमेनेलीने या सामन्यामध्ये विजय मिळविला आहे.

हे देखील पहा-

ऑलिम्पिकमध्ये लवलिना बोर्गोहाईनने जर्मनीची अऩुभवी बॉक्सर नॅडीने अॅपेत्झवर ३- २ असा रोमहर्षक विजय मिळविला आहे. पुढे उपांत्यपूर्व फेरीमध्ये तिने प्रवेश केला होता. यानंतर लवलिनाने महिलांच्या ६९ किलो वजनी गटामध्ये तैवानच्या निएन चिन चेनवर एकतर्फी विजय मिळविला आहे. त्यामुळे ती उपांत्य फेरी गाठलेली होती. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक मध्ये कुस्तीच्या लढतींना सुरुवात झाल्यावर भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून येत होता.

आज झालेल्या फ्री- स्टाईल कुस्तीत मध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया या भारतीय कुस्तीपटूंनी जोरदार खेळ रंगवत उपांत्य फेरी मध्ये धडक मारली आहे. तर आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या भालाफेकी मध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने जबरदस्त कामगिरी करत दिमाखात अंतिम फेरी पर्यंत पोहचले आहे.

अ गटात समावेश असलेल्या, नीरजने पहिल्याच प्रयत्नामध्ये तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट फिक्स केले आहे. मात्र, भालाफेकीच्या पात्रताच्या फेरीत ब गटामध्ये त्यांचा समावेश असलेल्या भारताच्या शिवपाल सिंह याला अपेक्षित कामगिरी मात्र करता आलेली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT