Sehwag Aarti Divorce saam tv
Sports

Sehwag Aarti Divorce: एकत्र राहत नाही, सोशल मीडियावरही केलंय अनफॉलो...; २० वर्षांनंतर वेगळे होणार सेहवाग-आरती?

sehwag aarti splitting rumors: वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत लग्नाच्या २० वर्षानंतर वेगळे होत असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग सध्या चर्चेत आला आहे. सहवागबाबत एक धक्कादायक आणि हैराण करणारी बातमी समोर आली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत लग्नाच्या २० वर्षानंतर वेगळे होत असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे. ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत एप्रिल 2004 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. आता त्यांच्या लग्नाला जवळपास 21 वर्षे झाली आहेत. आरती आणि वीरेंद्र सेहवाग हे आर्यवीर आणि वेदांत या दोन मुलांचे पालक आहेत.

सहवाग आणि आरतीच्या घटस्फोटाची अफवा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत दोघंही अनेक महिन्यांपासून वेगळे राहतायत. त्यामुळे त्यांच्यात घटस्फोट होण्याची शक्यता आहे. या जोडप्याला आर्यवीर आणि वेदांत अशी दोन मुलं आहेत. आर्यवीर यांचा जन्म 2007 साली झाला. तर, वेदांतचा जन्म 2010 मध्ये झाला होता.

वीरेंद्र सेहवागने काही महिन्यांपूर्वी दिवाळीच्या सेलिब्रेशनदरम्यान आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे फोटो पोस्ट केले होते. मात्र यावेळी त्याने पत्नी आरतीसोबतचे कोणतेही फोटो शेअर केले नव्हते.

दोन आठवड्यांपूर्वी वीरेंद्र सेहवागने केरळमधील पलक्कड इथल्या पुलिककल विश्व नागयाक्षी मंदिराला भेट दिली आणि त्याचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. सहवागच्या या पोस्टमध्येही आरतीचा कुठेही उल्लेख नव्हता. यावरून त्यांच्या नात्यातील तणाव दिसून येतो. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांनी अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलं नाही.

कसं जोडलेलं दोघांचं नातं?

दोघांची पहिली भेट एका लग्नात झाली, तेव्हा सेहवाग सात वर्षांचा आणि आरती पाच वर्षांची होती. वीरेंद्रच्या चुलत भावाने आरतीच्या मावशीशी लग्न केलं. त्यानंतर आरती आणि विरेंद्र या दोघांचं नातं अधिक घट्ट झालं होतं. जेव्हा सेहवाग 21 वर्षांचा झाला तेव्हा त्याने आरतीला प्रपोज केलं.

जवळच्या नातेवाईकांमध्ये झाला विवाह

सेहवागचं लग्न भाजपचे माजी दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या सरकारी बंगल्यात पार पडलं होतं. 2002 मध्ये सेहवागने गंमतीने आरतीला लग्न करण्यास सांगितलं. याला आरतीने मोठ्या गांभीर्याने उत्तर दिले आणि लग्नाला हो म्हणाली. खुद्द वीरूने एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.

दोघंही लग्नासाठी तयार होते मात्र सेहवागला घरच्यांना पटवायला खूप वेळ लागला. एका मुलाखतीत सेहवाग म्हणाला होता की, 'आमच्या कुटुंबात जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न झालेलं नाहीत. आमचे पालकही आमच्या लग्नासाठी तयार नव्हते, थोडा वेळ लागला, पण त्यांनी लग्नाला होकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT