lionel messi antonela roccuzzo saamtv
Sports

Lionel Messi Lovestory: बालपणीच्या मैत्रिणीवरचं जडला जीव, लियोनेल मेस्सीची हटके लवस्टोरी

आपल्या खेळीने मैदान गाजवणाऱ्या मेस्सीची लवस्टोरीही खूपच फिल्मी आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lionel Messi: फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सला चितपट करत अर्जेंटिनाने इतिहास रचला. या विजयानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेस मेस्सीचे स्वप्न साकार झाले आहे. आपल्या कारकिर्दितील शेवटचा विश्वचषक खेळत असलेल्या मेस्सीने जिगरबाज खेळ करत विजय खेचून आणला.

या ऐतिहासिक विजयाचे मेस्सीने आपल्या कुटूंबासोबत जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी मेस्सीची बायको एंटोनेलो रोकीजो आणि त्याची तिन्ही मुले मैदानात हजर होती. आपल्या धडाकेबाज खेळीने मैदान गाजवणाऱ्या मेस्सीची लवस्टोरीही खूपच फिल्मी आहे. जाणून घेवूया या स्टार खेळाडूची ही हटके लवस्टोरी.

लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि एंटोनेलो रोकीजो यांची लवस्टोरी खूपच खास आहे. अगदी लहानपणापासून दोघांची गट्टी जमली होती, तेव्हापासून ते दोघेही एकत्र आहेत. मेस्सी आणि एंटोनेलोची भेट वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी झाली होती. ज्या ठिकाणी मेस्सीचे बालपण गेले त्या अर्जेंटिनामधील रोसारियोमध्येच ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. त्यांच्या या भेटीचा किस्साही खूपच रंजक आहे.

त्यावेळी Newell’s Old Boys या फुटबॉल क्लबकडून मेस्सी खेळत होता. एकदा मित्राच्या घरी मेस्सी जेवायला गेला असता त्याची ओळख टीमधील मिडफिल्डरच्या चुलत बहिणीशी झाली. ती मुलगी म्हणजेच एंटोनेलो रोकीजो. या काळात त्यांच्यात फक्त मैत्री होती. वयाच्या ११ व्या वर्षी मेस्सीने अर्जेंटिना सोडले आणि तो बार्सिलोनाला शिफ्ट झाला.

लियोनेल मेस्सी बार्सिलोनाला शिफ्ट झाल्यानंतर एंटोनेलासोबतच्या त्याच्या भेटीगाठी बंद झाल्या. 2004 पर्यंत दोघे एकमेकांपासून लांबच होते. परंतु याच काळात एंटोनेला रोकुजोच्या जवळच्या मित्राचा कार अपघातात मृत्यू झाला.

त्यावेळी मेस्सीने एंटोनेलाला धीर दिला.तेव्हापासून दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरु झाली. दोघे परस्परांचे चांगले मित्र बनले. 2009 मध्ये मेस्सी आणि एंटोनेलाने आपली रिलेशनशिप पब्लिक केली. 2012 मध्ये या जोडप्याला पहिलं बाळ झालं. एंटोनेलाने एका मुलाला जन्म दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

SCROLL FOR NEXT