France: फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्स संघावर रोमहर्षक विजय अर्जेंटिनाने मिळवत इतिहास रचला. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात फ्रान्सनेही अर्जेंटिनाला कडवी झुंज दिली मात्र शेवटी त्यांना पराभव स्विकारावा लागला. फायनलमध्ये झालेल्या या पराभवानंतर फ्रान्समधील फूटबॉलप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी दंगली उसळल्या आहेत.
तब्बल36 वर्षांनंतर अर्जेंटिनाने फ्रान्सचा (France) पराभव करत फिफा वर्ल्ड कपवर कब्जा केला. पराभवानंतर फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये दंगली उसळल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोकांचा संताप स्पष्टपणे दिसत आहे. संतप्त समर्थकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे.
अर्जेंटिनाने फिफाचे (FIFA) जेतेपद पटकावताच दंगल सुरू झाली. पॅरिस, नाइस आणि लिऑनमध्ये हजारो फुटबॉल चाहते रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, रस्त्यावर प्रचंड गोंधळ स्पष्टपणे दिसत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक आणि फटाक्यांनी हल्ला करण्यात आला.
एका महिलेवर दंगलखोरांना पांगवण्याचा प्रयत्न केल्यामुळे हल्ला करण्यात आला अशीही माहिती एका ट्विटर युजरने दिली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, विश्वचषकातील पराभवानंतर झालेल्या गदारोळानंतर सशस्त्र पोलिसांनी पॅरिसच्या रस्त्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या सामना संपल्यानंतर हजारो फुटबॉल चाहते रस्त्यावर उतरले. फ्रान्सच्या राजधानीतील प्रसिद्ध चॅम्प्स-एलिसीजवर पोलिसांची चाहत्यांशी झटापट झाली, असे द सनने वृत्त दिले आहे.
दरम्यान, या सामन्यात पॅनेल्टी शूट आऊटमध्ये अर्जेेटिनाने फ्रान्सचा ४-२ अशा फरकाने पराभव केला. फ्रान्सच्या एम्बाप्पाने जबरदस्त खेळी करत अंतिम सामन्यात गोलची हॅट्रीक करण्याचा पराक्रम केला. सोबतच स्पर्धेत सर्वाधिक गोल करत त्याने गोल्डन बूटही पटकावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.