क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध पंच इंग्लंडचे डिकी बर्ड यांचं निधन झालं आहे. बर्ड यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इंग्लंडच्या काऊंटी क्लब यॉर्कशरने बर्ड यांच्या निधनाचं वृत्त दिलं. डिकी बर्ड यांच्या निधनाने क्रिकेट विश्वास शोककळा पसरली आहे.
डिकी बर्ड यांनी जवळपास १५० आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाची भूमिका निभावली आहे. इंग्लंडचे बर्ड यांचा जगभरात चाहता वर्ग होता. डिकी बर्ड यांच्या निधनावर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही शोक व्यक्त केला आहे. पंच होण्याआधी बर्ड हे क्रिकेटपटू होते. त्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती घेतली होती.
डिकी बर्ड यांनी मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यॉर्कशर काऊंटी क्लबने सांगितलं की, 'यॉर्कशर काऊंटी क्रिकेट क्लबला सांगताना दु:ख होत आहे की, हॅरर्ड डेनिस 'डिकी' यांचं निधन झालं आहे. डिकी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे'.
इंग्लंडच्या यॉर्कशर काऊंटीतील बार्न्सले येथे १९ एप्रिल १९३३ रोजी बर्ड यांचा जन्म झाला होता. हॅरल्ड डेनिस बर्ड असे त्यांचे पूर्ण नाव होते. डिकी बर्ड या नावाने ते क्रिकेट विश्वात प्रसिद्ध होते. त्यांनी क्रिकेटपटू म्हणून करिअरला सुरुवात केली, परंतु त्यांना फारसं यश मिळालं नाही. त्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृ्ती जाहीर केली. बर्ड यांनी ९३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. उजव्या हाताने फलंदाजी करणारे बर्ड यांनी ९३ सामन्यात ३३१४ धावा कुटल्या होत्या.
बर्ड यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी म्हणजे १९७० साली पंच म्हणून भूमिका निभावली. त्यांनी पहिल्यांदा काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यात पंचाची भूमिका निभावली. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करु लागले. १९९६ सालापर्यंत ते जगातील प्रसिद्ध पंच ठरले.
बर्ड यांनी ३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून भूमिका निभावली होती. १९७५, १९७९ आणि १९८३ साली खेळण्यात आलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बर्ड हे पंच होते. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला पराभूत करून भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी बर्ड यांनी पंचाची भूमिका निभावली होती. डिकी बर्ड यांनी एकूण ६६ टेस्ट आणि ६९ वनडे सामन्यात पंच होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.